Share

आमदार शिंदेंच्या बाजूने असले तरी जनता मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने, सर्वेतून झाला मोठा खुलासा

सध्या राज्यात काय राजकीय परिस्थिती आहे कोणालाच सांगण्याची गरज नाही. महाविकास आघाडीमध्ये आणि खासकरून शिवसेनेत खळबळ माजलेली आहे. एकनाथ शिंदे या सगळ्या परिस्थितीचे सुत्रधार आहेत कारण त्यांनी बंडखोरी केली आणि आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार गुवाहटीला घेऊन गेले.

या सगळ्या गोंधळात आता सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. अनेकवेळा आवाहन करूनही शिवसेनेचे हे आमदार परत यायला तयार नाहीत. त्यांनी शिवसेनेसमोर अट ठेवली आहे की, महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपासोबत युती करा. पण दुसरीकडे उद्धव ठाकरेही आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

त्यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे पण ते भाजपासोबत युती करायला तयार नाही. संजय राऊतही या आमदारांवर संतापले आहेत आणि गेल्या तीन दिवसांपासून ते या बंडखोरांवर सडकून टीका करत आहेत. पण याबाबत लोकांच्या आणि शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? हे जाणून घेणंही महत्वाचं आहे.

ते कोणाच्या बाजूने आहेत? त्यांची यामध्ये काय भूमिका आहे? हे समजून घेण्यासाठी सकाळ या वृत्तसंस्थेने एक सर्वे घेतला होता ज्यामधून सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की बंडखोर आमदारांना तुम्ही मतदान करणार का? त्यामध्ये दिसून आले की जनता या बंडखोर आमदारांवर संतापलेली आहे.

76 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. 11 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले आहे. तर 12 टक्के लोक त्यांच्या समर्थनार्थ आहेत आणि या बंडखोर आमदारांना मतदान करायला तयार आहेत. दुसरा प्रश्न असा होता की या बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने निदर्शने करणार का? त्यावर 52.3 टक्के लोकांनी होकार दिला आहे.

त्यामध्ये बऱ्याच शिवसैनिकांचा समावेश आहे. तर 13.6 लोकांनी सांगता येत नाही असं सांगितलं आहे. उरलेल्या 43.1 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले आहे. इतकं सगळं होऊनही लोकांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे. कारण लोकांना असंही विचारण्यात आलं होतं की, बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं असं तुम्हाला वाटतं का? त्यावर 77.2 लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे.

म्हणजे अजूनही लोकांचा शिवसेनेवर विश्वास आहे. 7.2 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले आहे. तर 15.6 टक्के लोकांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं आहे. पुढचा प्रश्न असा होता की, शिवसैनिकांची साथ कोणाला आहे? यामध्येही मोठा फरक दिसून आला.

तब्बल 82.4 टक्के शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत तर फक्त 13.7 टक्के शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहेत. शेवटचा प्रश्न खुप महत्वाचा होता. सध्या शिवसेनेत जे बंड सुरू आहे यावरून शिवसेनेत फुट पडली असे तुम्हाला वाटतं का? तर 43.3 टक्के लोकांनी याला होकार दिला आहे. तसेच 45.6 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहेे.

ही आकडेवारी निरीक्षण करण्यासारखी आहे. 11.1 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले आहे. यावरून लक्षात येते की जरी एकनाथ शिंदेंनी बंड केले असले त्यांच्या मागे 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असला तरी जनता मात्र उद्धव ठाकरेंच्याच मागे आहे. जनतेचा उद्धव ठाकरेंवर अजूनही विश्वास आहे.

महत्वाच्या बातम्या
स्विमिंग करताना वाजवायचे माऊथ ऑर्गन, सोड्याच्या बाटलीपासून बनवायचे संगीत, वाचा आरडी बर्मन यांच्याबद्दल..
चित्रपटसृष्टीवर शोककळा! राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह
उद्योगक्षेत्रातून धक्कादायक बातमी! मुकेश अंबानींनी तडकाफडकी दिला रिलायन्सचा राजीनामा
‘या’ 10 बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या आधीच होत्या प्रेग्नेंट, एक तर लग्न न करताच झाली होती आई

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now