सोनू सूद म्हणजे देवच! सोनू सूदच्या फोटोला लोकांनी चढविला हार; दुधाने घातला अभिषेक

चित्तूर | लॉकडाऊनमध्ये अभिनेते, खेळाडू, नेते मंडळींनी  वेगवेगळ्या तऱ्हेने गोरगरीब लोकांची मदत केली आहे. पण एका कलाकाराने मात्र त्याच्या कामांनी देशातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. हा कलाकार म्हणजे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद.

सोनू सूदने त्याच्या कामाने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. सोनू सूद नेहमी मदत करण्यास पुढे असतो. सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होत पुन्हा मदत करण्यासाठी धडपडत आहे.

सोनू सूदने देशातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मोठा खारीचा वाटा उचलला आहे. सोनू सूदच्या कार्याचे देशभरातून कौतूक होत आहे. आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातील श्रीकलाहास्तीमध्ये सोनू सूद करत असलेल्या कामाचा गौरव केला आहे.

यावेळी लोकांनी सोनूच्या भल्या मोठ्या फोटोला हार चढविला आहे आणि दुधाने अभिषेक घातला आहे.  सोशल मिडियावर सध्या व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. एका ट्विटर युजर्सने व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. सोनू सोदूनेही ट्विटला रिट्वीट केले आहे. सोनू सूद लोकांचे असलेले प्रेम पाहून भारावून गेला आहे.

सोनू सूदच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुली श्रीकांत होते. आंधप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील श्रीकलाहस्ती येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. पुली श्रीकांत यांनी सोनू सूदला प्रेरणा म्हणून घ्यावे व इतरांना मदत करावी, असं सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सोनू सूद यानेही व्हिडिओ रिट्विट करत लोकांचे आभार मानले आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी जीवंत व्यक्तीला हार का घातला आहे. तसेच दुधाचा नाश का करत आहेत. असे  सवाल विचारले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
आयपीएलनंतर धोनी पहिल्यांदाच आला कॅमरासमोर; साक्षीने शेअर केला जीवा आणि धोनीचा खास व्हिडिओ
“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
लाइमलाईटपासून दुर ‘असे’ आयूष्य जगत आहे अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी
ये कुठं निघालाय भाई; सायकलवरून फिरणाऱ्या कलेक्टरला महिला कॉन्स्टेबलने अडवलं आणि…

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.