आस्थेच्या नावावर अधर्म! दलित मुलाने मंदिरात प्रवेश केला म्हणून वडिलांना ठोठावला २५ हजारांचा दंड

कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील एका गावात मंदिरात प्रवेश केल्याबद्दल दोन वर्षांच्या दलित मुलाच्या कुटुंबाला 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी कोप्पल जिल्ह्यातील मियापूर गावातील चंद्रशेखरन आपल्या मुलाच्या वाढदिवशी गावातील हनुमान मंदिराला भेट देण्यासाठी गेले होते.

आस्थेच्या नावाखाली अन्याय!
जेव्हा चंद्रशेखरन पूजेमध्ये मग्न होते, तेव्हा त्यांचा 2 वर्षांचा निष्पाप मुलगा कुतूहलापोटी मंदिराच्या आत गेला. वास्तविक, कुठेही मुक्तपणे फिरणे हा मुलांचा स्वभाव आहे. असे म्हणतात की मुले हे देवाचे रूप आहेत. आपल्या देशात भगवान राम आणि भगवान कृष्णाच्या बाल रूपाची पूजा केली जाते.

हनुमानाचे तर लहानपणीचे किस्से सांगितले जातात. आता त्यांच्या मंदिरात अस्पृश्यता यांसारख्या जुन्या वाईट प्रथेचे पालन केल्याने सुसंस्कृत समाजामध्ये संतापाची लाट उसळली. त्याचवेळी, दलित मुलाच्या मंदिरात प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त करत, देशाच्या संविधानाच्या मूलभूत भावनेच्या विरुद्ध, पुजाऱ्याने त्यांचे वडील चंद्रशेखरन यांना जोरदार फटकारले.

कायद्याची थट्टा
या विषयावर 11 सप्टेंबर रोजी गावात झालेल्या बैठकीत मंदिराच्या शुद्धीकरणासाठी चंद्रशेखरन यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, जो त्यांनी भरण्यास नकार दिला. गावातील काही लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर त्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रकरण गावाच्या हद्दीतून बाहेर पडल्यानंतर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

पोलिसांचा इशारा
20 तारखेला हे प्रकरण स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर घटनेची पुष्टी केली. चंद्रशेखर यांच्या तक्रारीवर दंड ठोठावणाऱ्यांवर कारवाई करता आली असती तरी त्यांनी कोणाविरोधातही एफआयआर नोंदवण्यास नकार दिला.

अशा परिस्थितीत, पोलिसांनी सूओ मोटो अर्थात स्वतःची दखल घेत गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणातील 5 आरोपींना अटक केली आणि त्यांना तुरुंगात पाठवले. सध्या गावातील वातावरण शांत असून पोलीस गावावर नजर ठेवून आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी उच्च जातीच्या इतर सदस्यांना दलित मुलाला किंवा त्याच्या पालकांना काहीही त्रास दिला किंवा दंड ठोठावण्यासाठी भाग पाडले तर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असा ईशारा पोलिसांना उच्च जातीच्या सदस्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
“संज्याने ठरवलं त्याची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे”
मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण
पोलिस आयुक्तपदाचा थाट सोडून रोज गोदास्नान करणारे अधिकारी, IPS दीपक पांडेंचे फोटो व्हायरल..
शिवसेनेच्या मुखपत्रातूनच संजय राऊतांवर जोरदार टीका; तुम्ही पक्षाला ‘ना घर का ना घाट का’ करून ठेवले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.