१ एप्रिलपासून नवी योजना सुरू, एकदा भरलेल्या प्रीमियमवर आयुष्यभरासाठी पेन्शन; जाणून घ्या

मुंबई | आज प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात भविष्यासाठीचा आर्थिक आधार शोधण्याची तीव्र गरज आहे. कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू किंवा निवृत्तीनंतर जीवन सुखद होण्यासाठी पेन्शन सारखी आर्थिक तरतूद गरजेची आहे. अशा इच्छुक लोकांसाठी आता ‘आयआरडीएआय’ने ‘सरल पेन्शन योजना’ आणली आहे.

विमा कंपन्या १ एप्रिल २०२१ पासून सरल पेन्शन योजना सुरू करत आहेत. याबाबत विमा नियामक आयआरडीएआय ने ही पेन्शन योजना लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक आयुर्विमा कंपन्या पेन्शन योजना उपलब्ध करून देताता. मात्र त्यांच्या वेगवेगळ्या नियम आणि अटी यामुळे सर्वसामान्य लोक गोंधळात पडतात. यासाठी आता आयआरडीआयने ‘सरल पेन्शन योजना’ आणली आहे.

या योजनेत पॉलिसीधारक दोन प्रकराचे एन्युटी(Annuity) पर्याय निवडू शकतील. सर्व विमा कंपन्या ही योजना १ एप्रिलपासून बाजारात आणतील. या सर्व कंपन्यांच्या योजनांमध्ये वेगवेगळे दर असू शकतात. परंतु पेन्शनचे नाव सरल पेन्शन असेच असेल.

या योजनेत एकदाच प्रीमियम भरायचा असून, त्यावर विमा कंपनीकडून आयुष्यभरासाठी पेन्शन दिली जाणार आहे. योजनेचा लाभ ४० ते ८० वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला घेता येणार आहे.

सरल पेन्शन योजना ही एक इमीडिएट एन्युडी योजना आहे. म्हणजे पॉलिसी घेताच संबंधिताला पेन्शन सुरू होणार आहे. ग्राहकांना दरमाहा किंवा तिमाही, सहामाही किंवा वर्षिक पेन्शनची निवड करण्याचा पर्याय असेल.

तसेच पेन्शन योजनेत दोन पर्याय उपलब्ध असतील. प्रथम खरेदी किमतीच्या १०० टक्के परताव्यासह जीवन एन्युटी. हे पेन्शन अविवाहित जीवनासाठी असेल. म्हणजे जोपर्यंत पॉलिसीधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहिल. त्यानंतर पॉलिसीधारकाच्या उमेदवारास बेस प्रीमियम पैसै मिळतील.

योजनेच्या दुसऱ्या पर्यांयात पती-पत्नी दोघेही पेन्शनसाठी पात्र असणार आहेत. जो दिर्घकाळ टिकेल त्याला पेन्शन मिळणार आहे. याशिवाय महत्वाची बाब म्हणजे एकदा घेतलेली पेन्शन बाजारामध्ये व्याजाचे दर कितीही घसरले तरी कमी होणार नाहीत. हा योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे.

महत्वाच्या बातम्या-
महत्वाची माहिती! चाळीशीनंतर अशी करा गुंतवणूक आणि मिळवा दोन कोटी रुपये
‘या’ कंपनीकडून वाहन विमा घेऊ नका, IRDAI चा सावधगिरीचा इशारा
१२ आणि ३३० रूपये भरून मिळवा दोन लाख; मोदी सरकारची गरिबांसाठी विमा योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.