१० हजारात सुरु केली कंपनी, नीट इंग्रजीही येत नव्हती; वाचा पेटीएमच्या विजय शेखरांची संघर्षगाथा

डिजिटल पेमेंटची सेवा प्रदान करणारे पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांच्या डोळ्यात आज अश्रू आले आहे. जेव्हा पेटीएम स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होते तेव्हा हे घडले आहे. पेटीएमची आज स्टॉक मार्केटमधून लिस्टिंग सोहळ्याच्या निमित्ताने संबोधित करताना ते अचानक भावूक झाले आणि खिशातून रुमाल काढून डोळ्यातील अश्रू पुसताना दिसून आले आहे.

आज जरी ते करोडोंच्या कंपनीचे मालक असले, तरी त्यांचा आजपर्यंतचा प्रवास खुप संघर्षमय होता. २०१० मध्ये उत्तर प्रदेशातील अलीगढ येथून केवळ १० हजार रुपये आणून पेटीएमची पायाभरणी करणाऱ्या विजय शेखर शर्मा यांच्यासाठी आजचा क्षण खूप खास होता. बीएसईच्या व्यासपीठावर आपल्या कंपनीच्या शेअर्सची यादी करणे हे प्रत्येक व्यावसायिकाचे स्वप्न असते. विजय शेखर यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.

खरे तर विजय शेखर यांच्या भावूक होण्यामागे त्यांच्या संघर्षाची संपूर्ण कहाणी दडलेली आहे. केवळ १० हजार हातात घेऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी त्यांना इंग्रजीही नीट येत नव्हते. पण त्यांनी नेहमीच आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवले आणि आपल्या हिंमतीच्या जोरावर ते इथपर्यंत पोहचले.

पेटीएम सूचीकरण समारंभात राष्ट्रगीत वाजत असताना ४३ वर्षीय शेखर भावूक झाले होते. आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीतून करताना शेखर म्हणाले की, राष्ट्रगीत ऐकताच त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते म्हणाले, माझ्यासोबत घडले आहे, कारण मी यावेळी सर्वांसमोर राष्ट्रगीत गायले. भारत भाग्य विधाता हा शब्द मला खूप आनंदित करतो.

रुमालाने अश्रू पुसत शेखर यांनी त्यांच्या कंपनीबद्दल सांगत होते. ते म्हणाले की, लोकांनी मला सांगितले की एवढ्या मोठ्या किंमतीसाठी पैसे कसे उभे करणार? तेव्हा मी त्यांना सांगितले की मी किंमतीसाठी नाही तर कंपनीला चांगल्या स्थानी पोहचवण्याच्या हेतूने पैसे गोळा करतो आहे.

दरम्यान, पेटीएममध्ये मोठ्या आशेने पैसे टाकणाऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. One 97 Communications ही देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी आज शेअर बाजारात लिस्ट झाली होती, पण त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

कंपनीचे शेअर्स सवलतीसह शेअर बाजारात लिस्ट झाले. हे बीएसईवर १९५५ रुपयांच्या सवलतीसह म्हणजेच ९.०७ टक्के सूचीबद्ध झाले. त्याची इश्यू किंमत २१५० रुपये होती. म्हणजेच एका शेअरवर गुंतवणूकदाराला १९५ रुपयांचा तोटा झाला. कंपनीचा स्टॉक NSE वर ९.३ टक्क्यांच्या सवलतीसह १९५० रुपयांवर लिस्ट झाला होता.

महत्वाच्या बातम्या-
स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श केला तरी तो लैंगिक अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
शरद पवारांनी केले नितीन गडकरींचे तोंड भरुन कौतूक; म्हणाले, नितीन गडकरी खऱ्या अर्थाने काम करतात
दिलदारी! ज्यांच्या खऱ्या आयुष्यावर जयभीम सिनेमा आहे ‘त्या’ महिलेला सुर्याची १० लाखांची मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.