या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने नवीन अटी आणि शर्ती आणल्या. नवीन प्रायव्हसी पॉलिसी जर तुम्ही अमान्य केल्या तर तुमचे अकाऊंट डिलीट केले जाईल. यावर आता भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी भारतीयांना सिग्नल अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पण पेटीएमदेखील आपली महत्त्वाची माहिती घेते.
चिनी कंपनी अलीबाबा समर्थित भारतीय अॅप पेटीएम युजरचे लोकेशन ट्रॅक करते. तसेच कॉन्टॅक्टस इन्फो आणि डिटेल्स तर पेटीएमकडे असतातच. खरंतर याच माध्यमातून अकाऊंटस बनतात आणि आपण पेमेंट करता.
पेटीएम अॅप युजर्सची आर्थिक माहिती, लोकेशन, कॉन्टॅक्टस नंबर, नाव, कॉन्टॅक्टस आणि युजरचे फोटो, व्हिडिओ अशा माहितीही बघू शकते. खरंतर पेटीएम अॅपवर सरकारबरोबर युजर्सची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपुर्वी कोब्रा पोस्ट स्टिंग ऑपरेशननंतर पेटीएम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. पण “युजर्सचा डेटा शंभर टक्के सुरक्षित आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या विनंतीवरून त्यांना हा डेटा दिला जाऊ शकतो; मात्र याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेबरोबर डेटा शेअर केला जात नाही.” असे पेटीएमने स्पष्ट केले होते.
व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यानंतर विजय शेखर शर्मा यांनी ट्विट केले की, “भारतात व्हॉट्सअॅप आणि फेसबुक त्यांच्या एकाधिकाराचा चुकीचा वापर करत असून लाखो युजर्सची प्रायव्हसी गृहीत धरली जातेय. आता आपण सिग्नल अॅप वापरण्यास सुरूवात करायला हवी”. असे ट्विट त्यांनी केले. पण पेटीएमच आपली महत्त्वाची माहिती घेतो.
आत्म.हत्येची चिठ्ठी लिहून गायब झालेला शेतकरी सापडला; बच्चू कडूंविरुद्ध पत्नीने केली होती तक्रार
“…म्हणून दोन टक्केवाला ब्राह्मण असूनही राजकारणात टिकलो”; फडणवीसांनी सांगितला राजकीय मंत्र
ड्रग्स कनेक्शन प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला अटक; राजकीय वर्तुळात खळबळ