मुंबई | आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे ही रक्कम कर्मचाऱ्याच्या आई वडिलांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सभेत सगळ्यांचे मत घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जिल्ह्यात एकूण ५५ हजार कर्मचारी आहेत. ज्यामध्ये सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक यांचा समावेश आहे.
आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० टक्के कपात होणार आहे असा निर्णय आधी लातूर जिल्हा परिषदेने घेतली होती. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्हा परिषदेनेही हा निर्णय घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
यानंतर सर्व सदस्यांनी याला पाठिंबा दर्शवला आणि हा निर्णय घेण्यात आला. कांतीलाल घोडके यांनी शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्याची मागणी केली होती. यावर उपाध्यक्ष शेळके यांनी जिल्ह्यातील शाळाखोल्यांचे निर्लेखन करण्याची मंजुरी दिली आहे.
यावर जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले म्हणाले की, आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा विषय आला. यानंतर याला सगळ्यांनी सहमती दर्शवली. खरं तर असा ठराव करण्याची वेळच यायला पाहिजे नव्हती.