कंगना राणावतच्या ‘लॉक अप’ या शो अल्पकाळातच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या शोमध्ये नेहमीच काही ना काही खुलासे होत असतात. काही दिवसांपूर्वी तहसीन पूनावाला(Tahseen Punawala) या स्पर्धकाने ‘लॉक अप’ या शोमध्ये मी देशाच्या बड्या उद्योगपतीच्या पत्नीसोबत रात्र घालवली आहे, असा खळबळजनक खुलासा केला होता.(payal rohtagi conterversial statement in lock up)
आता आणखी एक स्पर्धकाने तिच्या आयुष्यातील काही गुपित गोष्टींचा खुलासा केला आहे. यामुळे सिनेविश्वात खळबळ माजली आहे. “माझ्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मी काळी जादू आणि वशीकरण करायचे, असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री पायल रोहतगी हीने केला आहे. ‘लॉक अप’ या शोमधील जजमेंट डेच्या दिवशी अभिनेत्री पायल रोहतगीने हा खुलासा केला आहे.
जजमेंट डेच्या दिवशी स्पर्धकाला या शोमध्ये टिकून राहण्यासाठी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामधील कोणतीही एक सिक्रेट गोष्ट सांगावे लागते. यावेळी पायल रोहतगी म्हणाली की, “मी 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. एक काळ असा होता की माझे करिअर चांगले चालत नव्हते. माझे करियर पुढे नेण्यासाठी मी तांत्रिक पूजा करायचे. मी वशिकरण देखील केले. पण या सगळ्याचा मला फायदा झाला नाही.”
आतापर्यंत तहसीन पूनावाला, साईशा शिंदे, करणवीर बोहरा, अंजली अरोरा आणि निशा रावल यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक रहस्ये ‘लॉक अप’ या शोमध्ये सांगितली आहेत. स्पर्धक पायल रोहतगी हीने काळी जादू आणि वशीकरणासंदर्भात खुलासा केल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावतने यावर शोमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री कंगणा राणावत यावर म्हणाली की, “तू काळी जादू करून लोकांना वश करण्याचा प्रयत्न केलास. पायल मला वाटतं तू सुंदर आणि प्रतिभावान आहेस. तुला तांत्रिकाची गरज नाही. तू लोकांना काहीही न करता वशमध्ये करू शकतेस.” यावेळी अभिनेत्री कंगणा राणावतने तिच्या संघर्षांच्या दिवसांतील आठवणी देखील सांगितल्या.
अभिनेत्री कंगणा राणावत म्हणाली की, “जेव्हा मी इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा माझ्याबद्दल देखील लोकांनी अशा अफवा उठवल्या होत्या की ही मुलगी काळी जादू करते. ज्यावेळी मुली यशस्वी होतात, त्यावेळी लोक त्यांच्यावर शंका घेतात की या मुलीच्या मागे काही जादुई शक्ती असेल”, असे अभिनेत्री कंगणा राणावतने सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रियकर विराजसशी गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर
ऑस्कर विजेत्या coda ने चोरली बॉलिवूड चित्रपटाची कथा? सलमान खानने केली होती ‘त्या’ चित्रपटात भूमिका
‘भाजपने ‘द काश्मीर फाइल्स’ ची फुकट तिकिटे वाटली तशीच पेट्रोल-डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत’