ढसाढसा रडत पायल रोहतगीने लॉकअपमध्ये सांगितले जीवनातील वाईट सत्य, म्हणाली, मी कधीच..

कंगना राणावतचा ‘लॉकअप’ हा शो सध्या अंतिम टप्याकडे वाटचाल करत आहे. या शोमधील स्पर्धक अंतिम फेरीत पोहचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान ‘लॉकअप’ शो मधील स्पर्धक पायल रोहतगीने एक मोठा खुलासा केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिने जे गुपित लपवून ठेवले होते, ते गुपित पायलने सर्व स्पर्धकांसमोर उघड केले आहे.(payal rohatagi said truth about her life)

यामुळे इतर स्पर्धकांना धक्का बसला आहे. मी आयुष्यात कधीच आई होऊ शकत नाही, असे अभिनेत्री पायल रोहतगीने ‘लॉकअप’ शोमध्ये सांगितले आहे. पायलने स्वतः कॅमेऱ्यासमोर हा खुलासा केला आहे. संग्रामने मला लग्नासाठी विचारले होते. पण मी आई होऊ शकत नसल्यामुळे मी त्याला नकार दिला, असे अभिनेत्री पायल रोहतगीने शोमध्ये सांगितले.

गेली पाच वर्षे मी यासाठी प्रयत्न करत आहे. IVF केले पण तेही यशस्वी झाले नाही, असे देखील अभिनेत्री पायल रोहतगीने सांगितले. यावेळी अभिनेत्री पायल रोहतगी भावुक झाली होती. अभिनेत्री पायल रोहतगीने कॅमेऱ्यासमोर सांगितले की, “मी संग्रामला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर, असा सल्ला दिला होता. पण तो मान्य करत नाही. ”

अभिनेत्री पायल रोहतगीने पुढे सांगितले की, “आता मी स्वतःवर आणि माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहे. जर तुम्हाला मूल होत नसेल तर तुम्ही काय करू शकता? आम्ही दोघे लग्न करणार आहोत. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे”, असे पायल रोहतगीने ‘लॉकअप’ शोमध्ये सांगितले. काही दिवसांपूर्वी संग्राम सिंहने अभिनेत्री पायल रोहतगीला लग्नासाठी प्रपोज केले होते.

पायलने दिलेल्या वक्तव्यावर संग्राम सिंहने देखील प्रतिक्रिया दिली आहे. संग्राम सिंह म्हणाला की, “परिस्थिती कशीही असो, मी तिला सदैव साथ देईन. ती आई होऊ शकत नाही याचा अर्थ असा नाही की मी दुसरीकडे लग्न करावे. मला तिच्यामध्ये कोणतीही कमतरता दिसत नाही. माझ्यासाठी ती एक परिपूर्ण जीवनसाथी आहे.”

अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंह २०११ पासून डेट करत आहेत आणि एकत्र राहत आहेत. त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांची भेट “सर्व्हायव्हर इंडिया’ या शोच्या सेटवर झाली होती. काही दिवसांनी दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; गाडीत होते ‘हे’ मराठी अभिनेते
नेतेमंडळींवर हजारोंचा वाहतूक दंड, चंद्रकांत पाटील म्हणाले घरंदारं विकायची वेळ येईल
टेम्पो चालकाचा मुलगा MPSC मध्ये महाराष्ट्रात आला पहिला, पुर आला तरी सोडला नाही अभ्यास