चहा पावडर विकून ही महिला बनली करोडो रुपयांची मालकीन; वाचा कशी…

 

व्यवसाय करणे लोकांचे स्वप्न असते, पण व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते. अशात काही लोक आपल्या भन्नाट कल्पना लावून कमी भांडवलात व्यवसाय सुरु करुन लाखो रुपये कमवतात.

तुम्ही व्यवसाय सुरु करत असाल आणि तुमची कल्पना जर चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो, याचे उत्तम उदाहरण हरियाणातील पायल मित्तल अग्रवाल.

पायल चहा पावडरचा व्यवसाय करुन करोडोंची उलाढाल करत आहे. सध्या त्यांच्या चहा पावडर व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर २ कोटी रुपये इतके आहे.

पायल यांना आधीपासूनच शिक्षणाची आवड नव्हती. त्यामुळे त्यांना त्यांचे पदवीचे शिक्षणही घेतले नाही. पायल यांचे लग्न घरच्यांनी लवकर लावून दिले. त्यामुळे त्यांना मुलेही लवकर झाली. पण त्यांना फक्त चुल आणि मुलपर्यंत सिमित राहयचे नव्हते त्यांना आयुष्यात काहीतरी बनायचे होते.

पायल यांनी स्वता:चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच त्यांनी एक रेस्टॉरंट सुरु केले. पण या व्यवसायात तिला यश मिळाले नाही, त्यामुळे पायलने चहा पावडर विकण्याचा व्यवसाय सुरु केला.

त्यासाठी त्यांनी कुठलेही विशेष प्रशिक्षण घेतले नव्हते. त्या एकदा युरोपला गेल्या होत्या. तेव्हा तिने एक भारतीय महिलेला दार्जिलिंगच्या प्रसिद्ध चहा पावडर विकताना बघितले. तेव्हाच तिने चहा पावडर विकण्याचा निर्णय घेतला होता.

पायलने सुरवातीला या व्यवसायात ७ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर तिने आपल्या मेहनतीवर पुर्ण व्यवसाय सेटल केला आहे. त्यांच्या चहा पावडरला आता विदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

पायल यांची कंपनी १०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या चहा पावडर बनवतात. ग्रे टी, ग्रीन टी, कॉफी, जॅस्मीन टी, अँटी स्ट्रेस टी, तसेच मसाला चहा, डिटॉक्स चहा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे उत्पादन त्यांची कंपनी घेते. पायल यांनी आयुष्यात संघर्ष करुन आपले ध्येय गाठले आहे, त्यामुळे त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.