राजगर्जना! ‘वीज बील भरू नका, वीज तोडायला कोण आले तर मनसेला फोन करा’

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून वीज बिलांवरून राजकीय वातावरण तापले आहे. यावरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातच आता याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

वीज बिला विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर मोर्चे काढले आहेत. आता वीज बील भरू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने देखील राज्यभर आंदोलन सुरू केली आहेत.

यावेळी जर तुमची वीज तोडण्यासाठी कोणी आल तर स्थानिक मनसे कार्यकर्त्याला फोन करा असेही त्यांनी सांगितले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

कोरोना काळात अनेकांना वाढीव विजबील आले आहे. याचा फटका अनेकांना बसला आहे. सरकारने वीजबिल माफ करू असेही सांगितले होते, मात्र परत हे वीजबिल भरावे लागेल असे सरकारकडून सांगण्यात आले. यामुळे आता विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. भाजपने राज्यभर विजबिलाची होळी करत आंदोलनाला सुरुवात केली.

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. यावरून आता राज्यात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. पुढील काळात हा प्रश्न राज्यभर गाजण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.