पवार, ठाकरेंचे विकृत फोटो पोस्ट करणाऱ्या फडणवीस फॅन क्लब व कोमट बॉईज अँड गर्ल्स ग्रुपवर गुन्हा दाखल

देशातील महान राष्ट्रपुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांनी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

या संदर्भातील अधिक माहिती शिवसेना पक्षाचे पुणे उपशहरप्रमुख किरण साळी यांनी दिली आहे. शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अश्लील शब्द वापरून सोशल मीडियात बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील तक्रार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील युवासेना उपप्रमुख आकाश शिंदे यांनी पोलिसात दिली आहे. ही घटना घडली तेव्हाची तारीख ४ मे होती.

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक ग्रुपसोबतचच कोमट बॉईज अँड गर्ल्स फेसबुक ग्रुप आणि सीएम देवेंद्र फडणवीस ग्रुप या ठिकाणी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे चारित्र्य हणन होईल असे फोटो पोस्ट करण्यात आले.

मॉर्फ केलेले फोटो, अश्लील भाषेतला मजकूर वापरुन जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने पोस्ट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्वरूप भोसले नावाच्या व्यक्तीने ट्विटर समाजमाध्यमांवर समाजात तेढ होईल असा मजकूर पोस्ट केला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.