अनलिमिटेड थाळी म्हणटलं की आपले पाय आपोआप हॉटेल्सकडे वळतात. आजकाल किती वेगवेगळ्या अनलिमिटेड थाळ्या खुप प्रसिद्ध आहेत. बाहुबली थाळी, सरपंच थाळी, खासदार थाली ही नावं तर आपण ऐकलीच आहेत. पण पवार नॉनव्हेज थाळी आणि फडणवीस व्हेज थाळी असं नाव ऐकलं आहे कधी?
अमरावतीमधील हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटने महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवरफुल असलेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावे व्हेज आणि नॉनव्हेज थाळी खवय्यांसाठी उपलब्ध केली आहे.
या रेस्टॉरंटने पवार नॉनव्हेच थाळी’ आणि ‘फडणवीस व्हेज थाळी’ सुरु केली आहे. अमरावतीमधील प्रसिद्ध असलेल्या हेरिटेज किचन या हॉटेलने एक नवा उपक्रम सुरू केलाय. ज्यात ६०० रुपयात पवार मांसाहारी थाळी तसेच ४०० रुपयात फडणवीस शाकाहारी थाळी आहे.
पवार मांसाहारी थाळीमध्ये मटण, चिकन, अंडाकरी, फिश सह एक चिकन बिर्याणी, अनलिमिटेड भाकरी पोळ्या किंवा तंदुरी रोटी मिळते. तसेच स्वीट, आईस्क्रीमसुद्धा मिळेल. तर फडवणीस नावाच्या शाकाहारी थाळीत तीन भाज्या, दालफ्राय, एक स्वीट, आईस्क्रीम, व्हेज बिर्याणी, अनलिमिटेड पोळ्या किंवा भाकरी किंवा तंदूर रोटी मिळते.
विशेष म्हणजे दोन व्यक्ती असल्याशिवाय ही थाळी मिळणार नाही, हा कडक नियम आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्यामुळे त्याची नासाडी होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘मोदीजी चीनला आपल्या प्रदेशातून कधी हाकलणार त्याची पण तारीख देशाला सांगा’
शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती; ७/१२ च्या नावात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती करायची सोपी पद्धत
सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा तोल गेलाय; काँग्रेसचा घणाघात