“पवारांनी काँग्रेसची‌ काळजी करू नये, त्यांना अजून स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही”

मुंबई । काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. यामुळे काँग्रेस नेते देखील आक्रमक झाले आहेत. आता काँग्रेस नेते राज्याचे ऊर्जामंत्री नितील राऊत यांनी पवार यांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ज्यांना एकदाही स्वतःच्या पक्षाच्या मुख्यमंत्री बसविता आलेला नाही, त्या शरद पवारांनी काँग्रेसची‌ काळजी करू नये.

यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसची अवस्था ही नादुरुस्त हवेलीसारखी झाली आहे. यामुळे हा वाद चांगलाच वाढला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील यावर उत्तर दिले होते. आता नितीन राऊत आक्रमक झाले आहेत.

काँग्रेस पक्षावरील टीका आम्ही सहन करणार नाही, शरद पवार यांना एकदाही स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री राज्यात बसवता आलेला नाही. ममता बॅनर्जी, मायावती या बहुमताने निवडणुका जिंकत त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. पण, पवारांना ते अद्याप जमले नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःकडे पहावे.

पवारांनी केलेल्या टीकेचा आम्ही निषेध करतो. तसेच ते म्हणाले, आमच्यासाठी शरद पवार हे आदरणीय नेते आहेत. सरकारमध्ये ते आमचे मित्रपक्ष आहेत. मात्र, अनेक वर्षांचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसवर पवार अशी टीका करणार असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकदा सरकारमध्ये खटके उडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचे आमदार देखील एकमेकांवर टीका करत आहेत. यामुळे हे सरकार किती दिवस चालेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.