“पवारसाहेब तुम्ही बारमालकांसाठी सवलत मागताय, तसेच एखादे पत्र शेतकऱ्यांसाठी पाठवा”

मुंबई । राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे मात्र अनेकांचे नुकसान होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात पवारांनी हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी शरद पवारांनी केली. यावरून आता मात्र राजकारण तापले आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरून शरद पवारांवर टीका केली ते म्हणाले, पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी मराठा आरक्षणावरून देखील पवारांवर टीका केली. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे.

बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय, असे म्हणत त्यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, यावर पवारांनी अजूनही प्रतिक्रिया दिली नाही.

ताज्या बातम्या

कोरोना झालेला असतानाही तो लग्नाच्या वरातीत नाचला अन् साऱ्या गावाला कोरोना देऊन आला

रेमडीसीवीरसाठी खूप लोकांनी मागणी केली पण कोरोनील हवे ही मागणी कुणीच केली नाही

साऊथची टॉपची अभिनेत्री तृषा आणि राणा दग्गूबत्तीचे ‘या’ कारणामूळे होऊ शकले नाही लग्न

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.