पाटील आणि मुश्रीफ गटाने गोकुळ दूध संघाची निवडणूक जिंकली, महाडीक गटाच्या सत्तेला सुरूंग

कोल्हापुर | गोकुळ दूध संघाची निवडणूक २ मे रोजी पार पडली होती. सत्ताधारी महाडिक गट आणि  विरोधी सतेज पाटील व हसन मुश्रीफ गटामध्ये निवडणूक चांगलीच रंगली होती. अखेर निकाल पाटील आणि मुश्रीफ गटाच्या बाजूने लागला आहे.

गोकुळ दुध संघाच्या निवडणूकीकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात उतरले होते. यामध्ये २१ पैकी १७ जागांवर पाटील मुश्रीफ गटाने विजय मिळवत सत्ताधारी महाडिक गटाच्या सत्तेला सुरूंग लावला आहे.

महाडिक गटातील अवघे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. सत्ता हातातून गेल्याने महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या सुरूवातीपासून विरोधी गटातील उमेदवार आघाडीवर होते. ही आघाडी कायम ठेवत महाडिक गटाला धक्का दिला आहे.

कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनल उभं केलं होतं. तर सत्तेत असलेल्या महाडिक गटाकडून राजर्षी शाहू आघाडी पॅनल उभं करण्यात आलं होतं. कोल्हापुर जिल्ह्यात ७० केंद्रावर मतदान पार पडलं होतं.

जिल्ह्यात एकूण ३६५० मतदार होते. मात्र तीन जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याने एकूण ३,६४७ जणांनी उमेदवारांच्या पारड्यात मतं टाकली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत बाजी कोण मारतय. याकडे कोल्हापुरकरांच लक्ष लागले होते.

कोरोनामुळे गोकूळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर पडली होती. नियमांची आखणी करत अखेर निवडणूक पार पडली. मतदारांनी सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करता मतदानाचा हक्क बजावला. तब्बल ३० वर्षानंतर गोकूळ दूध संघाचा गड खेचून आणल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिक्षकांनी हाती घेतला समाजसेवेचा वसा; कोरोना रुग्णांसाठी उभारलं ७० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर
जुगाड! लॉकडाऊनमुळे चक्क विहीरीत लागलं लग्न, पाहा अनोख्या लग्नसोहळ्याचा व्हिडिओ
आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, केंद्र सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीय; न्यायालयाने झापले

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.