काय सांगता! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृतीही झाली स्थिर

राज्यासह देशात सगळीकडे कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन मिळणंही कठीण झाले आहे.

मात्र एक वेगळीच घटना आला समोर आली आहे. चार ते पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पाचही रुग्ण शाहजहांपुरमधील तिलहरच्या गुनगुन मॅरिज लॉन रोडवरील एक पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपले.

त्यांना तिथे ठेवल्यावर त्यांची तब्येत ठीक झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना पाहाण्यासाठी तिथे एकच गर्दी झाली होती. येथील आमदार या झाडाखाली झोपलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

हे सर्वजण रुग्णालयात गेले होते, मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, कोरोनाची सर्व लक्षणं या लोकांमध्ये होती. रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने रुग्णालयाने दाखल करुन घेण्यासही नकार दिला आणि त्यांना घरी माघारी पाठवले.

असे असताना घरी त्यांची प्रकृती आणखीच खालावली, त्यांना ऑक्सिजन सिलेंडरही कोठेच मिळाला नाही. यादरम्यान कोणीतरी त्यांना सल्ला दिला, की पिंपळाच्या झाडाखाली झोपल्यास भरपूर ऑक्सिजन मिळेल.

यानंतर हे पाच पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपले. घरात आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, मात्र आता बरे वाटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेताचा खेळ खल्लास; अखेर सत्याचाच होणार विजय

भारतातच आहे जगातील सर्वात मोठे कुटुंब; या माणसाला आहेत ३९ बायका अन् ९४ मुलं, तरीही…

क्रिकेटपटू ऋतूराज गायकवाडवर ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा लव्ह

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.