चिंता वाढली! ब्लॅक फंगसपेक्षा धोकादायक असलेल्या येलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला

नवी दिल्ली । देशात कोरोनाने हाहाकार उडवला असताना आता रोज धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. कोरोना संपत नाही तोच दुसऱ्या रोगाने आता शिरकाव केला आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केला आहे. यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

असे असताना आता ब्लॅक फंगसपेक्षाही धोकादायक असलेल्या येलो फंगसचा पहिला रुग्ण उत्तर प्रदेशात सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे आता याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

३४ वर्षाच्या या तरुणाला हा आजार झाला आहे. हा आजार अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. भूक न लागणे, वजन कमी होणे आणि सुस्ती येणे आदी लक्षणे, याची आहेत. ही लक्षणे असल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावा.

हा आजार नवीनच असल्याने यावर सध्या तरी amphoteracin b हे इंजेक्शन उपयुक्त आहे. हे इंजेक्शन ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीफंगल आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे आपण जास्त काळजी घ्यावी हा यावर सध्या तरी ठोस पर्याय आहे.

हा फंगस जसजसा वाढतो, तसतसा अधिक घातक होतो. या फंगसची लागण झालेली असल्यास आणि अंगावर जखम असल्यास त्यातून पाण्याचा स्त्राव होतो. याकाळात वजन देखील कमी होते. आणि भूक लागत नाही.

यामुळे आता कोरोनावर अजूनही पूर्णपणे प्रभावी असे औषध आले आहे. असे असताना या ब्लॅक फंगसच्या आजाराने विळखा घातला. त्यानंतर लगेच व्हाईट फंगसनेही थैमान घातले. यामुळे आता जगायचे तरी कसे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या

पतीचं ११ हजार बील भरण्यासाठी पत्नीकडे नव्हते पैसे; रुग्णालयाने मंगळसुत्रचं घेतलं ठेवून

सुशील कुमारला फासावर लटकवा, त्याचे सर्व मेडल काढून घ्या; सागर राणाच्या कुटुंबाचा आक्रोश

बँक ऑफ बडोदाचे १ जूनपासून ‘हा’ नियम बदलणार; ग्राहकांच्या डोक्याला वाढणार ताप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.