‘हम है नये अंदाज क्यों हो पुराना’ गाण्यावर पाठक बाईंचा धमाकेरदार डान्स; व्हिडीओ पाहून तुमचेही पाय थिरकतील

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला संपून अनेक दिवस झाले आहेत. पण तरीही चाहत्यांमध्ये त्या मालिकेतील कलाकारांचे क्रेझ कमी झाले नाही. प्रेक्षक आजही पाठक बाई आणि राणादाच्या जोडीचे दिवाने आहेत. त्यामूळे त्यांच्या संबंधातील प्रत्येक गोष्ट सोशल मिडीयावर खुप लवकर व्हायरल होते.

मालिकेत पाठक बाईंची भुमिका निभावणारी अभिनेत्री अक्षया देवधरचे लाखो दिवाने आहेत. लोकं तिच्या फोटोंना आणि व्हिडीओला खुप पसंत करतात. म्हणून ती देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ती नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मैत्रीणींसोबत डान्स करताना दिसत आहे. ‘दिल चाहता है’ चित्रपटातील ‘हम है नये अंदाज क्यू हो पुराना… गाण्यावर ती मैत्रीणींसोबत डान्स करत आहे.

या व्हिडीओल तिने ‘या तो दोस्ती गहरी है… या तो ये व्हिडीओ थ्री डी है’ असे कॅप्शन दिले आहे. अक्षयाच्या या डान्स व्हिडीओला लोकांनी खुप पसंत केले आहे. व्हिडीओला खुप कमी वेळात लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.

अक्षयाने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या मालिकेने अक्षयाला खुप जास्त प्रसिद्धी मिळाली. तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. अक्षयाच्या प्रसिद्धीमूळे ही मालिका एक दोन वर्ष नाही तर चार वर्ष सुरु होती.

तुझ्यात जीव रंगला मालिकेने अक्षयाला घराघरात ओळख निर्माण करुन दिली. या मालिकेमूळे अक्षया नेहमीच चर्चेत असायची. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरीही प्रेक्षक अक्षयाला विसरले नाहीत.

मालिकेला संपून फक्त काही महिने झाले आहेत. तरी प्रेक्षकांनी तिच्या दुसऱ्या मालिकेची मागणी केली आहे. ती लवकरच मालिका किंवा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

सोनम कपूरच्या छोट्या बहीणीने शेअर केले बिकनीतील फोटो; सोशल मिडीयावर रंगली चर्चा

काय बोलावे! अभिनेते राजकूमार यांनी त्यांच्या कुत्र्याला विचारुन हिट चित्रपटाला नाकारले होते

‘द डर्टी पिक्चर’ बघितल्यानंतर विद्या बालनच्या आई वडीलांनी दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

शेवटच्या दिवसांमध्ये स्वत:च्याच घरासाठी चढावी लागली कोर्टाची पायरी; खुपच वाईट होता अभिनेत्री साधनाचा शेवट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.