“पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे पॅट कमिन्सने दाखवून दिले आहे”

मुंबई । कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना अनेकजण सध्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आता आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू पॅट कमिन्सने ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास ३० लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला केली आहे.

यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कमिन्सचे आभार मानले आहेत. अनेकजण सध्या कोरोना परिस्थितीवर आपल्या परीने मदत करत आहेत. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

आव्हाड म्हणाले, ॲास्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्सने भारताला ५० हजार डॅार्लसची मदत केली. त्याबद्दल त्याचे मनापासून आभार, पण पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे त्याने दाखवून दिले आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

तो ऑस्ट्रेलियन खेळाडू असला तरी त्याने भारताला मदत केली आहे. सध्या अनेक खेळाडू, कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कमिन्सने केलेल्या मदतीने भारतीयांच्या मनात त्याने वेगळे असे स्थान निर्माण केले आहे.

देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर सुध्दा उपलब्ध होत नाहीत. यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे.

ताज्या बातम्या

‘मी अजिबात ठिक नाही’, व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टी ढसाढसा रडली

भारत माझ दुसरं घर, तिथल्या लोकांना तडपताना नाही पाहू शकत; ब्रेट लीने केली ४१ लाखांची मदत

‘जेवण नंतर करू, आधी देशासाठी ऑक्सिजन करायचाय’; खानेपिणे सोडून काम करताहेत कामगार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.