पॅट कमीन्सची घोषणा: पंतप्रधान मोदींच्या पीएम केअर फंडाला दिलेली मदत रद्द करणार, पण..

नवी दिल्ली । देशात आलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांचे मोठे हाल सुरू आहेत. आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेकजण आपल्या परीने मदत करत आहेत.

परदेशी खेळाडू देखील भारताला मदत करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा व कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज पॅट कमिन्सने ट्विट करून आपण भारताच्या कोरोना लढ्यात मदत करण्यासाठी देण्यात येणारी रक्कम ही UNICEF ऑस्ट्रेलियाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

अगोदर पॅट कमिन्सने ५० हजार डॉलर ही रक्कम PM Care Fundला दान करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता त्याने तो निर्णय मागे घेतला आहे. मात्र तो भारताला मदत करणार आहे.

तो ही रक्कम UNICEF ऑस्ट्रेलियाला देणार आहे. यामुळे त्याने हा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू झाली आहे. भारत संकटात असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मदतीचा हात पुढे केला आहे. ऑस्ट्रेलिया असोसिएशन आणि यूनिसेफ ऑस्ट्रेलियाकडून भारताला कोरोना लढ्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

यामध्ये ५० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याशिवाय त्यांनी इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये पॅट कमिन्सने मदत केली आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, मी आधी जाहीर  केलेली रक्कम ही UNICEF ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून भारताच्या कोरोना लढ्यासाठी दान करत आहे.

तसेच तुम्हाला शक्य असेल, तर तुम्हीही पुढाकार घ्या, आणि मदत करा, असे त्याने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक खेळाडू कोरोनासाठी मदतनिधी देत आहेत. तसेच इतरही मदत कोरोना लढ्यासाठी करत आहेत.

ताज्या बातम्या

आता ममतांचा मोर्चा दिल्लीकडे! सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत आखली २०२४ ची रणनीती

पंढरपूरमध्ये होणार फेरनिवडणूक.? भाजपकडून गैरप्रकार झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

पराभूत झालो तरी संपलो नाही; पुढच्या वेळी पराभवाचे उट्टे काढील; भगीरथ भालकेंचा निर्धार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.