त्या रात्री परवीन बाबी बिना कपड्यांच्या महेश भट्टच्या मागे पळाल्या होत्या, पण तरीही..

बॉलीवूडमध्ये आज अनेक अभिनेत्री बिंधास्तपणे छोटे कपडे घालतात. बिकीनी घालतात. पण बॉलीवूडला एवढं बोल्ड बनवणाऱ्या परवीन बाबी होत्या. हे खुप कमी लोकांना माहीती असेल.

परवीन बाबीनेच बॉलीवूडला हा बोल्ड अंदाज दिला आहे.
परवीन बाबी बॉलीवूडच्या सर्वात बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांच्या काळामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक नवे ट्रेंड सुरु केले होते.

त्या काळामध्ये बॉलीवूड अभिनेत्र्या जास्त करुन साड्या घालायच्या. पण हा ट्रेंड परवीन बाबी यांनी बदलला. त्यांनी चित्रपटांमध्ये बोल्ड आणि बिंधास्त ट्रेंड सुरु केला.

बॉलीवूडला एवढं काही देणाऱ्या अभिनेत्रीचा अंत मात्र खुप दुखदायक होता. त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.

परवीन बाबी चित्रपटांसोबतच आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होत्या. ते म्हणजे त्यांचे अफेअर्स. त्यांचे अनेक अफेअर्स होते. कबीर बेदी आणि डॅनी यांच्यासोबत त्यांचे नाते खुप गाजले. पण ते नाते जास्त काळ टिकू शकले नाही.

त्यानंतर परवीन दिग्दर्शक महेश भट्टच्या प्रेमात पडल्या. महेश भट्ट देखील परवीनवर खुप प्रेम करत होते. त्यांच्या प्रेमासाठीच महेश भट्टने आपली पत्नी व मुले सोडून परवीनबरोबर लिव्ह-इनमध्ये राहायला सुरुवात केली.

लिव्ह-इनमध्ये राहत असताना महेश भट्टला परवीनबद्दल अनेक गोष्टी समजल्या. परवीन बाबी एका मानसिक आजाराशी सामना करत होत्या. त्यामूळे त्यांना अनेक वेळा अनेक भास होत होते

याबद्दल महेश भट्ट यांनी स्वत एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे. महेश भट्ट यांनी सांगितले की,’ मी आणि परवीन बेडरूममध्ये होतो. आम्ही दोघे बोलत होतो. बोलता बोलता परवीन बाबी अचानक म्हणाल्या की मी युजी किंवा त्यांच्यापैकी एकाला निवडावे.’

युजी म्हणजे कृष्णमूर्ती जे एक तत्वज्ञानी आणि गुरु होते. परवीन यांची तब्येत ढासळली होती. तेव्हा त्या युजी यांच्या कामाच्या विरोधात होत्या. यामूळेच त्यांनी युजीला नापसंत करण्यास सुरुवात केली.

अशा परिस्थितीत त्यांनी महेश भट्ट यांना परवीन किंवा युजी दोघांपैकी एक निवडायला सांगितले. त्यावेळी महेश भट्ट यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ते अंथरुणावरुन उठले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. महेश भट्टला जाताना बघून परवीन रडू लागल्या.

त्यांनी महेश भट्टला थांबायला सांगितले. पण ते त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यावेळी परवीन कपड्यांविना महेशच्या मागे पळायला लागल्या. या अवस्थेत परवीन आपल्यामागे धावताना पाहून आश्चर्यचकित झाल्याचे महेश भट्टने सांगितले.

पण त्यावेळी महेश भट्ट यांनी परवीन बाबीला घरी नेले आणि झोपी घातले. त्यानंतर महेश भट्टने परवीनपासून लांब जाण्याचा निर्णय घेलता. ते आपल्या परिवाराकडे निघून गेले.

हळूहळू महेश भट्ट यांनी परवीनपासून दूर राहण्यास सुरुवात केली. पण या सर्व गोष्टींमूळे परवीन बाबी यांची मानसिक स्थिती अजून बिघडली. त्यांना आपल्याला कोणीतरी मारेल असे भास होऊ लागले.

आजारपणामुळे निर्माते परवीन यांच्याकडून चित्रपट काढून घेवू लागले. त्या घरी बसू लागल्या आणि त्यांचे वजन वाढले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण फायदा झाला नाही.

त्यांनी एकटे राहण्यास सुरुवात केली. शेवटी २० जानेवारी २००५ रोजी परवीन बाबी यांनी जगाचा निरोप घेतली. पण त्यांचा मृत्यू झाला आहे. ही गोष्ट दोन दिवसांनी लोकांना समजली.

बॉलीवूडच्या एका सुंदर पर्वाचा असा अंत झाला. त्यामूळे सर्वांनाच धक्का बसला होता. बॉलीवूडच्या या झगमगत्या दुनियेत प्रभावशाली अभिनेत्रीचा असा अंत वेदनायक होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.