पार्थ मनाने खुप चांगला पण …, रोहित पवारांनी व्यक्त केले रोखठोक मत

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याबाबत त्यांचे बंधू आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच रोखठोक मत व्यक्त केले. तसेच त्यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

पार्थ यांच्यासोबत तुमचे संबंध कसे आहेत, याबाबत रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, आमचे संबंध खूप चांगले आहेत, लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो, गप्पा मारायचो, एकमेकांची मस्करी करायचो. तसेच दिवाळीला अजित दादा आम्हाला पोत भरून फटाके आणायचे, आम्ही ते वाटून घेऊन उडवायचो.

पार्थ मनाने खूप चांगला आहे, पण निर्णय घेताना कधीकधी अचानक निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत ते आम्हाला ठाऊक आहे. विरोधक तसेच काही माध्यमे याबाबत चुकीचा प्रसार करतात.

आम्ही अजूनही वेळ मिळाला की एकत्र बसतो बोलतो, असेही रोहित पवार म्हणाले. तसेच त्यांची काम करण्याची पद्धतही वेगळी आहे. मावळमध्ये तेथील कामे करण्यात ते सक्रिय असतात.

अजितदादांकडे एखादे काम असले तर ते पार्थ पवारांना मार्फत केले जाते. तसेच तेथे काही पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यासोबत विचारविनिमय करून पार्थ हे काम करत असतात. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे.

पार्थ यांनी राजकारणामध्ये सक्रीय व्हावं असं वाटतं का?, यावर पार्थ हे सक्रीय असल्याचे रोहित पवार म्हणाले. मावळ मतदारसंघामध्ये फिरत असतात. अनेक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते काम करत आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांमागील खरी कारणं आली समोर; कारणं वाचून तुम्हाला बसेल धक्का

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन

खऱ्या आयुष्यात पण सलमान आहे हिरो; कॅन्सर रुग्णाची आणि सलमानची ही गोष्ट ऐकून तुम्ही व्हाल भावूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.