अजितदादांचे कट्टर राजकीय शत्रू हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला गेले पार्थ पवार; राजकीय भूकंपाचे संकेत…

मुंबई : राज्याच्या राजकारणात भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात. तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा अरुणराव पाटील यांचे निधन झाले. १८ मार्च २०२१ रोजी अल्पशा आजाराने अनुराधा पाटील यांची प्राणज्योत मालवली.

या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी हर्षवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आणि पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्याने विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहिला होता. लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही, राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा आपल्याला सोडली नाही, असा आरोप करत पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडताना मित्रपक्ष राष्ट्रवादीवर टीका देखील केली होती. मात्र इंदापुरात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवूनही हर्षवर्धन पाटलांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या 

भारतीय वैज्ञानिकाचा पुन्हा नासात डंका, एका रुममधून गुप्ता सांभाळताय नासाचे मिशन

१२ वर्षाचा असताना ११० रुपये घेऊन मुंबईत पळून आला होता, आता आहे ४० करोडच्या कंपनीचा मालक

सलाम या माणसाला! पाय अपंग असुन ३ किलोमीटर धावला अन् वाचवला हजारोंचा जीव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.