१०-२० नाही तर १००० रुपयाला चहा विकतोय ‘हा’ माणूस आणि कमवतोय लाखो रुपये

 

अनेकांना नोकरी करण्यापेक्षा स्वता:चा व्यवसाय करण्याची इच्छा असते. पण व्यवसाय करताना तो व्यवसाय तेव्हाच चालतो, जेव्हा तुमची कल्पना चांगली असेल तेव्हाच तुमचा व्यवसाय चांगला तरच तुमचा व्यवसाय चांगला चालू राहू शकतो. आजची ही गोष्ट पण अशीच काहीशी आहे.

आपण अनेकदा चहाच्या स्टॉल बघतो, तिथे आपल्याला खुप झाल्यातर एक दोन प्रकारच्या चहा प्यायला मिळतात, पण आजची गोष्ट अशा एका माणसाची आहे, जो १०० प्रकारच्या चहा विकतो. त्याच्याकडे १२ रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतचा चहा मिळतो.

कोलकताच्या मुकुंदपरमध्ये हा माणूस चहा विकतो. या माणसाचे नाव पार्थ प्रतिम गांगुली असे आहे. विशेष म्हणजे हा माणूस कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये चहा विकत नाही, तर त्याची तो फक्त छत्री लावून एक टेबल टाकून हा व्यवसाय करत आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तो एवढ्या छोट्याशा दुकानात तो १०० प्रकारच्या चहा विकतो. त्याच्याकडे १२ रुपये कपांपासून १००० रुपये प्रतिकपची सुद्धा चहा आहे.

१००० रुपयाला असणाऱ्या या चहाला Bolay-tea म्हणतात, या चहाची चहापत्ती ३ लाख रुपये किलो प्रतिग्रॅम आहे. या दुकानात सिल्वर नीडल व्हाईट टी, लेवेंडर टी, व्हिबीस्कस टी, वाईन टी, तुलसी जिंजर टी, ब्लु टीशन टी, तिस्ता वॅली टी, मकईबारी टी, रुबियोस टी, ओक्टी टी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चहा आहेत.

पार्थ आधी नोकरी करायचे पण त्यांचे नोकरी करण्यात मन लागत नव्हते, त्यांना काहीतरी स्वता:चे सुरु करायचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि २०१४ मध्ये निर्जश नावाने ही चहाची दुकान सुरु केली.

विशेष म्हणजे त्याने चहा विकण्यासोबतच त्या चहाचे फायदेही त्याने दिले आहे. त्यांच्या या भन्नाट प्रयोगामुळे ते लाखो रुपयांची करत तर आहे, सोबतच ते देशभरात प्रसिद्ध झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.