वा रं मर्दा! आर्चीचा परश्या उतरला कुस्तीच्या मैदानात, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

मुंबई | मराठी चित्रपट ‘सैराट’ २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला रिलीज होऊन ४ वर्षे झाली तरी हा सिनेमा आजही नवीन वाटतो. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले आहेत.

चित्रपटातील आर्ची आणि परशाच्या जोडीने संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात आर्चीची भुमिका रिंकू राजगूरू आणि परशाची आकाश ठोसर यांनी निभावली आहे.

सैराटनंतर अभिनेता आकाश ठोसरला अनेक चित्रपटांमध्ये, वेबसीरिज मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘द वॉर इन द हिल्स’ या वेबसीरिजमध्ये त्याने एका सैनिकाची भूमिका साकारली होती. त्याच्या सैनिकाच्या पोशाखामधील फोटो त्याने सोशल मिडियावर शेअर केले होते. त्याच्या या भूमिकेलाही त्याच्या चाहत्यानी पसंद केले आहे.

सोशल मिडियावर आकाशने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो कुस्तीचे मैदान गाजवताना दिसत आहे. द वॉर इन द हिल्स या वेबसीरीजची शुटिंग सूरू असतानाचा सीन त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये परशा कुस्ती खेळत आहे आणि त्याचे शुटींग सूरू आहे. परशा वेगवेगळे डाव टाकून पैलवानाला लाल मातीत उचलू उचलू आपटत आहे. नंतर परशाला खांद्यावर उचलून घेतले आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने “खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी” असं कॅप्शन दिलं आहे.

पोस्टमध्ये त्याने ५ वर्ष तालमीत केलेल्या मेहनतीबद्दल सांगितलं आहे. तालमीत सोबत सराव करणारे पैलवान, लाल मातीत मार्गदर्शन करणारे गूरूजन, पैलवान मित्र यांनी तालमीत लढायला खेळायला शिकवलं. त्याचा उपयोग अभिनय क्षेत्रात होत असल्याचं सांगत त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान आकाश ठोसरने सैराट नंतर नागराज मंजूळे यांच्याच झुंड चित्रपटात फुटबॉलपटूची भूमिका साकारली आहे. झुंडमध्ये त्याने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. तसेच अभिनेत्री राधिका आपटेसोबत तो लस्ट स्टोरीज या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
महत्वाच्या बातम्या-
…अन् तात्याराव लहानेंनी चहा पिता पिताचं हॉटेलमध्ये रूग्णांची केली तपासणी, वाचा काय घडलं
आठवड्याभरातच दीड हजार रुपयांनी सोनं स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा भाव
सेक्स आयकॉन बोलणाऱ्या लोकांना श्रीदेवीने दिले होते ‘हे’ उत्तर; उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल
महिलांच्या कार्याला अनोखा सलाम, आनंद महिंद्रांनी शेअर केला खास व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.