यांचा एक रूपया सुद्धा घेऊ नका, कोवीड सेंटरसाठी अमिताभ बच्चनने दिलेले २ कोटी परत करण्याची मागणी

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थिती अनेक सेलिब्रिटी लोकांना मदतीला धावून येत आहे. सोनू सुद, सलमान खान कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून येत आहे.

अशात जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आता कोविड सेंटरसाठी मोदी देणगी दिली आहे. दिल्लीतील गुरुद्वारा रकाब गंज साहीब, यांनी सुरु केलेल्या श्री गुरु तेग बहादूर कोविड सेंटरसाठी २ कोटी रुपये दान दिले आहे.

आता काही लोकांनी अमिताभ बच्चन यांच्या देणगीला विरोध केला आहे. उत्तर प्रदेशातील अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य सरदार परमिंदर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर टिका केली आहे. तसेच त्यांना दोन कोटी परत देण्याची मागणी केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी दिल्ली शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला कोरोना लढाईसाठी २ कोटी रुपयांची मदत केल्याची सांगण्यात येत आहे. तिसऱ्या गुरुंच्या वेळेही सम्राट अकबरलाही बरीच जागा आणि जमीन द्यायची होती. पण तिसऱ्या गुरुंनी ते स्विकारले नाही, कारण ती अकबरची संपत्ती नव्हती, असे परमिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

हे तेच अमिताभ बच्चन आहे, ज्यांनी १९८४ च्या दंगलीमध्ये शीख दंगलीत महत्वपुर्ण भुमिका साकारली होती. तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख लोकांविरोधात दंगली भडकावल्या होत्या. अशा व्यक्तीकडून देणगी घेतल्यास शीख समाजासाठी हे श्रेयस्कर नसेल, असेही परमिंदर यांनी म्हटले आहे.

शीख समाजाकडे पैशाची कमतरता नाही. आम्ही प्रत्येक घरासमोर जाऊ हात जोडू पैसे मागु.म्हणून अशा प्रकारचे दान तातडीने परत करा. माझी अशी विनंती आहे, की जर माणूसकीच्या विरोधात कामे करणारी कोणतीही व्यक्ती असेल, तर गुरुंच्या घरात त्यांचा रुपया सुद्धा घेतला नाही पाहिजे, असेही परमिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, आम्ही काय करावं सांगू नये”; भाजप नेत्याने दिला चव्हाणांना दम
फ्रिज न घेताही ताज्या ठेवतात आठ दिवसापेक्षा जास्त दिवस भाज्या; जाणून घ्या योग्य पद्धत
बीडची ढोबळी मिरची हैदराबादला विकून पठ्याने तीन महिन्यात कमावले ७ लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.