सुप्रीम कोर्टात गेलेले परमबीरसिंग तोंडावर आपटले; कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

दिल्ली: अनिल देशमुख व राज्य सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेले परमबीरसिंग तोंडावर आपटले आहेत. त्यांची बदली तसेच अनेक तक्रारी घेऊन सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले की तुम्ही आधी उच्च न्यायालयात का गेला नाही. कोर्टाने म्हटले की ही तक्रार बरीच गंभीर आहे परंतु आपण आधी उच्च न्यायालयात जावे. असे सांगून कोर्टाने याचिका फेटाळत कोर्टाने त्यांना हायकोर्टात जायचा आदेश दिला आहे. त्यामुळे परमबीरसिंगांना आता मुंबई हायकोर्टात नवीन याचिका दाखल करावी लागेल.

काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रातून केला आहे.

अखेर परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

याचिकेत परमबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी प्रकरणात तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा याची आपण खात्री केली होती. याशिवाय एनआयएकडून होणाऱ्या तपासात कोणताही अडथळा आणला नव्हता.

‘आकसापोटी आपली बदली करण्यात आली असून केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी याचिका दाखल केली होती.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. त्यानंतर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली.

कोर्टाने याचिका फेटाळत कोर्टाने त्यांना हायकोर्टात जायचा आदेश दिला आहे. त्यामुळे परमबीरसिंगांना आता मुंबई हायकोर्टात नवीन याचिका दाखल करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या 

करण जोहरने त्याच्या करोडोंच्या संपत्तीमध्ये शाहरुख खानच्या मुलांना दिला आहे वाटा; कारण…

गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या, महाविकास आघाडीतील काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी

नोकरीत परत घेण्यासाठी २ कोटी, तर कारवाई न करण्यासाठी ५० लाखांची मागणी; परमबीर सिंग अडचणीत

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.