डाव उलटला! आता परमबीरसिंगही अडकणार? एनआयए परमबीरांचीच चौकशी करणार; हाजीर हो…

मुंबई: गेले काही दिवस महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेल्या सचिन वाझे केसला पुन्हा नवे वळण मिळाले आहे. १०० कोटींच्या खंडणीचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुखांवर करणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंगच या प्रकरणात अडकत चालल्याचे पहायला मिळत आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त  परमबीर सिंग आज सकाळीच एनआयएच्या मुंबई येथील कार्यालयात हजर झाले आहेत. त्यामुळे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा कसोशीने तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आता माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसेच स्वता परमबीरसिंगच आता या प्रकरणात अडकतात की काय अशीही शक्यता यानित्ताने व्यक्त होत आहे. परमीरसिंगांनी सीबीआय चौकशाची मागणी केली होती पण आता त्यांचीच एनआयए चौकशी होत आहे.

सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत मुंबईतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे. सचिन वाझे यांची कोठडी आज संपणार असल्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांची कोठडी वाढवण्यासाठी सचिन वाझेला कोर्टात दाखल करण्यात येईल.

दरम्यान या प्रकरणाची खोलकर चौकशी करत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महाराष्ट्राच्या गृह खात्याला एक गोपनीय अहवाल पाठवला आहे. परंतू हा गोपनीय अहवाल आता माध्यमांच्या हाती लागला आहे. या अहवालातून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येत आहेत.

मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नगराळे  यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

वाझे साधे सहाय्यक पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनाच रिपोर्टींग करायचे. मधल्या कोणत्याही अधिकाऱ्याला ते रिपोर्टींग करत नव्हते. जे की संकेतांच्या विरोधात आहे. पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत असे चालत नाही.

तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याच सांगण्यानुसार अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास सचिन वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही हेमंत नगराळेंच्या या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांनी सचिन वाझे यांच्या‌ क्राईम ब्रॅंचमधील नियुक्तीला स्पष्टपणे  विरोध केला होता. पण या विरोधाला डावलून परमवीर सिंग यांनी सचिन वाझेंची क्राईम ब्रॅंचमध्ये  नियुक्ती केली, असा गौप्यस्फोट या अहवालात करण्यात आला आहे.

निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास त्याला कोणत्या पदावर घ्यायचे याचे काही संकेत आहेत. या संकेतानुसार निलंबीत अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास त्याला अकार्यकारी पद देण्यात येते. मात्र सचिन वाझेंना सेवेत घेऊन लगेचच त्याला कार्यकारी पद दिल्यामुळे पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांनी त्याला विरोध केला होता.

सचिन वाझे यांना क्राईम ब्रॅंच युनीटचे प्रमुखपद देण्यासही विरोध झाला होता. सचिन वाझे प्रमुख असणाऱ्या क्राईम ब्रॅंच युनीटचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

सचिन वाझे यांच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती.ज्यावेळी हायप्रोफाईल प्रकरण असेल त्या वेळी‌ गृहमंत्र्यांना ब्रीफिंग करताना परमवीर सिंग यांच्यासोबत सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
वाझे कोणाला किती पैसे द्यायचा? एआयएला भेटली सगळी कागदपत्रे; होणार सगळी पोलखोल
नाव परमवीर अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी; रूपाली चाकणकरांनी केली भलतीच पोलखोल
परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढतीये

अनिल देशमुख यांची विकेट घेणाऱ्या ऍड. जयश्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.