गृहमंत्र्यांवरील आरोपांसंबंधी पुरावे आहेत का? कोणी काहीही सांगेल मग लगेच चौकशीचे आदेश द्यायचे का?

मुंबई : माजी पोलीस आयुक्त व सध्या पोलीस महासंचालक असलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे. याप्रकरणी, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यांतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. परमबीर यांच्या बाजूनं जेष्ठ वकील विक्रम नानकानी, तर राज्य सरकारकडून महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी बाजू मांडत आहेत.

सुनावणीच्या पहिल्याच दिवशी न्यायालयाने परमबीर सिंग यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. एफआयआर दाखल न करता सीबीआयची चौकशी कशी? थेट सीबीआयकडे चौकशी दिल्याचं एक तरी उदाहरण दाखवा, असा सवाल करतानाच तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहात का?, अशा शब्दात उच्च न्यायालयाने सिंग यांना फटकारले.

यावेळी मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंह यांना विचारलं की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची मागणी तुमच्यासमोर केली होती का?.’ तसेच सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांवरील आरोपासंबंधी काही पुरावे आहेत का? असाही प्रश्न परमबीर सिंह यांना विचारला.

तसेच, तुम्ही ज्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आरोप केले आहेत, त्यांचे प्रतिज्ञापत्र तरी जोडले आहे का?”. “उद्या मलाही मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणीही काही सांगेल, मग त्यावर विसंबून चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात का? कारवाई केली जाऊ शकते का?”, असेही प्रतिप्रश्न न्यायालयाने विचारले.

महत्त्वाच्या बातम्या 

धक्कादायक! ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने सिलेंडर घेऊन कोरोना रुग्णाचा महापालिकेसमोर ठिय्या    

युपी बिहार लुटण्याच्या चक्करमध्ये कोर्टात पोहोचले होते शिल्पा शेट्टी आणि गोविंदा

जुही चावलाने स्वतःच्याच हाताने केले होते स्वतःचे नुकसान; करिश्मा कपूरला बनवले स्टार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.