परमबीरसिंगांच्या संपत्तीची राष्ट्रवादीकडून पोलखोल; मुंबई, हरियाणात कोट्यावधींची मालमत्ता

पुणे | मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते. असा गंभीर आरोप केला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी परमबीर सिंगांवर जोरदार निशाणा साधत त्यांची संपत्ती लोकांसमोर मांडली आहे.

नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधी पक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं. असं कसं चालेल?

तसेच चाकणकरांनी परमबीर सिंगांची संपत्तीही जाहीर केली आहे. मुंबईत चार कोटी रूपये किंमतीचे दोन फ्लॅट, तर हरीयाणातील आपल्या गावी चार कोटींचे घर, मुंबई हरीयाणामध्ये कोट्यावधींची मालमत्ता, पत्नीच्या नावेही कोट्यावधींची संपत्ती असल्याचं चाकणकरांना म्हटलं आहे.

२००३ मध्ये नेरूळमधील शगुफा सोसायटीत ३.६० रूपयांना आणखी एक फ्लॅट, हरीयाणातील त्यांच्या गावी कुटूंबीयांच्या व स्वत:च्या नावे संयुक्त रित्या ४ कोटी रूपये किमतीचे घर, २०१९ मध्ये हरियाणामध्ये १४ लाख रूपयांची जमीन खरेदी. अशी परमबीर सिंग यांची संपत्ती जनतेसमोर मांडली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलं आहे. त्यामध्ये गृहमंत्र्यांनी म्हटले की, परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांमध्ये काहीह सत्यता नाही. त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपुर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करून दुध का दुध पानी का पानी करावं. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान परमबीर सिंगांच्या खळबळजनक आरोपानंतर भाजप आणि महाविकास आघाडी एकमेकांवर आक्रमक झाली आहे. भाजपनेच महाविकास आघाडी सरकारच्या बदनामीसाठी रचलेलं हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
गुऱ्हाळ्याचे काम आनंदाने करणाऱ्या कांचनताई, महाराष्ट्रातील पहिल्या ‘महिला गुळव्या’
“भाजप बरोबर राहण्यासाठी पोलिस अधिकारी रश्मी शुक्लांनी ‘या’ आमदाराला धमकावलं”
संजय राऊत तुम्ही काय शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? नाना पटोलेंनी राऊतांना झापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.