समाजात तेढ निर्माण करणाऱ्या न्युज चॅनेल्स विरोधात बजाज मैदानात; पारलेनेही घेतला मोठा निर्णय

मुंबई | मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या TRP घोटाळा प्रकरणानंतर माध्यमांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. यामध्ये रिपब्लिक या वृत्तवाहिनीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचा समावेश आहे.

यानंतर उद्योगपती आणि बजाज कंपनीचे संचालक राजीव बजाज यांनी तीन न्यूज चॅनेल्संना बॅन केले आहे. समाजात विष कालवणाऱ्या, तेढ निर्माण करणाऱ्या कोणासोबतही आम्ही व्यवहार करु इच्छित नाही. बजाज एक विश्वासपूर्ण ब्रँड असून आम्ही सामाजिक बांधिलकी जपतो, असेही राजीव बजाज यांनी म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर पारले कंपनीने देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितले की, सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंट प्रसारीत करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवर पारले जी बिस्किटाची जाहिरात करण्यात येणार नाही.

याचबरोबर आमच्या या निर्णयाचे स्वागत करुन इतरही कंपन्यांनी असा मापदंड ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी दिली आहे. तसेच, टीव्ही न्यूज चॅनेल्संना यातून स्पष्ट संदेश देण्यात येईल की, आपल्या कंटेंटमध्ये बदल गरजेचा आहे, असे बुद्ध यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, बजाज कंपनीच्या पावलावार पाऊल ठेवल्या कारणाने ‘पारले जी’ कंपनीवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचबरोबर पारले व बजाज प्रमाणेच देशातील इतरही कंपन्यानी असा निर्णय घ्यायला पाहिजे असे युजर्सकडून सांगण्यात येत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘आपले आयुष्य उध्वस्त केले’, रिया तुरुंगातून घरी येताच रियाच्या आईने दिली पहिली प्रतिक्रिया
अमेरीकेतील लाखोंची नोकरी सोडून आली शेती करायला, आज मोठमोठ्या हाॅटेल्सला जातात उत्पादने
सरकारी अधिकारी असूनही आठवड्यातील एक दिवस करतेय शेतीत कष्ट; कारण ऐकून हैराण व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.