राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले होते. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती. तसेच केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर देखील हल्ला करण्यात आला होता.(parkash-mahajan-statement-on-pankja-munde)
पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून सतत अन्याय केला जात आहे, अशी भावना यावेळी त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली होती. या सर्व प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन(Prakash Mahajan) यांनी मत व्यक्त केलं आहे. पंकजा मुंडे यांचा भाजपकडूनच राजकीय एन्काउंटर करण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप मनसे प्रवक्ता आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान प्रकाश महाजन यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यावेळी मनसे प्रवक्ता आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन म्हणाले की, “पंकजा मुंडे कराडांच्या कार्यालयावर हल्ला करेलच कशी, त्यामुळे मी एका पक्षाचा प्रवक्ता असलो तरीही मामा म्हणून मला पंकजा मुंडे यांच्या बदनामीचे कट कारस्थान वाटत आहे.”
“तर पंकजाचा राजकीय एन्काउंटर करण्याचा पक्षातूनच प्रयत्न केला जात आहे. हे कोण करत आहे, याबद्दल सर्वांना माहिती आहे. स्त्री म्हणून पंकजावर बंधने आहेत. म्हणून सर्व गोष्टी उघड करता येत नाहीत. पंकजा मुंडे यांनी कधीच विधान परिषदेच्या तिकीटाची मागणी केली नाही. पंकजा स्वाभिमानी स्त्री आहे”, असे पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी सांगितले आहे.
मनसे प्रवक्ता आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, “पंकजाचे राजकीय पुनर्जीवन करण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना असू शकते. बोलणारे हेच नाकारणारे हेच मग यावर पंकजाने स्पष्टीकरण का दयायचे असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे. पंकजाची बदनामी करण्याचा आणि सामान्य लोकांमध्ये स्थान कमी करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे”, असे देखील प्रकाश महाजन यांनी सांगितले आहे.
“पंकजाचे समर्थक पंकजाची बांधील आहेत, पक्षाशी नाहीत. पण या प्रकरणामुळे पंकजा अस्वस्थ आहेत. त्यांचे कुटुंब अस्वस्थ आहे. एखाद्या स्त्रीचा पराभव करण्यासाठी, जेरबंद करण्यासाठी, नामोहरम करण्यासाठी हे चक्रव्युव्ह करत असेल तर कालांतराने पडद्याआडचा तो व्यक्ती बाहेर येईल”, असे पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमेदवारी स्विकारणार का? पवारांनी दिले बुचकळ्यात पाडणारे उत्तर
राज ठाकरेंना कडाडून विरोध करणाऱ्या बृजभूषणने आदित्य ठाकरेंचे केले जंगी स्वागत
नाद खुळा! सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या जॉब लाथ मारत पाळली गाढवं; आता कमवतोय लाखो रुपये