अभिनेत्री परिणीती चोप्रा झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या पाठिशी, म्हणाली…

बंगळूरू | बंगळूरूमध्ये काही दिवसांपुर्वी एका मॉडेलचा आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा वाद झाला होता. वादावादीत डिलिव्हरी बॉय कामराजनने मारहाण केल्याचा आरोप मॉडेल हितेशाने केला होता. डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने ती मॉडेल खोटे बोलत असल्याचं सांगितलं होतं.

पोलिसांना कामराजनने सांगितले की ऑर्डर आणण्यास उशीर झाल्याने त्या तरूणीनेच मला चपलेने मारहाण केली आहे. मला शिवीगाळ केली आहे. त्यानंतर डिलिव्हरी बॉयच्या पाठिशी अनेकजण उभा राहिले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सुध्दा त्याच्या मदतीसाठी पुढे आली आहे.

ट्विट करत परिणीती चोप्राने म्हटले आहे की, “झोमॅटो इंडिया कृपया या प्रकरणातील सत्य शोधून काढा. आलेली माहिती सार्वजनिक करा. जर तो व्यक्ती निर्दोष असेल तर त्या महिलेविरोधात कारवाई करण्यासाठी मदत करा. तो व्यक्ती निर्दोष असल्याची मला पुर्ण खात्री आहे. त्या व्यक्तीची मी कशी मदत करू शकते. याबाबत मला मार्गदर्शन करा.”

अभिनेत्री परिणीती चोप्रासह अनेकजण कामराजनच्या पाठीशी उभे राहिले आहेत. कामराजन खरं बोलत असून त्या महिलेने खोटे आरोप त्याच्यावर लावलेले आहेत. असं अनेकांनी म्हटलं आहे.

दरम्यान सोशल मिडियावर कामराजन याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो हात जोडून रडत रडत त्याला झालेला त्रास सांगत आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करून या प्रकरणात काय सत्य बाहेर येतयं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
झोमॅटोवरून मागवलेले जेवण रद्द का केले? म्हणत डिलिव्हरी बॉयने दिला तरूणीला ठोसा
…तर ठाकरे सरकार कोसळेल; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक
श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन फर्नांडिसचा हॉट अंदाज; शेअर केला टॉपसेल फोटो
देवमाणूस! परिस्थितीमुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत शिक्षकाने थाटला संसार

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.