कोरोनाने मुलाला हिरावले; ही वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून आईवडीलांनी तोडली १५ लाखांची एफडी

अहमदाबाद | देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांना लस, बेड, ऑक्सिजन यांचा पुरवठा होत नाही.  देशात अत्यंत धक्कादायक अवस्थेत रुग्ण जीव गमावत आहेत.

कोरोनाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना घेरलं आहे. कुणी उपचार घेऊन बरं होऊन  घरी आलं आहे. तर कुणाचा उपचार सुरू असतानाचा जीव गेला आहे. घरातील  सदस्याच्या मृत्यूने  कुटूंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळत आहे.

गुजरातच्या सुरत शहरामधील  कल्पना मेहता आणि रसिक मेहता या पतीपत्नीने आपल्या लाडक्या लेकाला कोरोनामुळे गमावले आहे.  ऐन तारूण्यात मुलाचा मृत्यू झाल्याने मेहता दाम्पत्यावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता.

मात्र मुलाच्या आठवणीत सतत दु:खी राहण्यापेक्षा आपल्यावर जी वेळ आली ती दुसऱ्यावर येऊ नये म्हणून त्यांनी रुग्णांना मदत करायची ठरवली.  मुलाच्या भविष्यासाठी मेहता यांनी १५ लाखांची FD करुन ठेवली होती.

याच पैशाने मेहता यांनी रुग्णांना २०० पेक्षा जास्त आयसोलेशनमध्ये किट आणि इतर साहित्य वाटले आहे. तसेच ३५० पेक्षा जास्त नागरीकांना लसीकरणासाठी पैसे खर्च केले आहेत. मेहता यांनी मुलाच्या मृत्यूनंतर खचून जाता रुग्णांची मदत करण्याचं पाऊल उचलल्याने अनेकांनी त्यांचे कौतूक केले आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आजवर  १ कोटी ६९ लाख कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या २४  तासात देशात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २,७६७ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाॅलीवूड पुन्हा हादरले! पद्मभूषण विजेत्या बड्या संगीतकाराचे कोरोनाने निधन
सेल्समनचं एकाच वेळी तब्बल ३५ महिलांसोबत होतं लफडं; अन् त्यानंतर जे घडलं…
धक्कादायक! अवघ्या ३३ व्या वर्षी भारताच्या वेगवान गोलंदाचा मृत्यू
रुग्णांच्या मदतीला मंत्र्यांची मुलं सरसावली; कोणी मारतंय झाडू, तर कोणी उचलतंय गाद्या

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.