डेलकर आत्महत्या प्रकरणी भाजपा नेत्यांना अडकवण्यासाठी होता देशमुखांचा दबाव – परमबीर सिंग

मुंबई : दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे राज्याचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे.

याचबरोबर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अजून एक गंभीर आरोप केला आहे. “दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात काही भाजपा नेत्यांना अडकवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता”, असा दावा परमबीर सिंग यांनी याचिकेमध्ये केला आहे.

‘मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून आपल्याला आकसाने हटविण्यात आले, ती बदली रद्द करावी,’ असेही परमबीर सिंग यांनी याचिकेत म्हटले आहे. ‘देशमुख गृहमंत्रिपदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत आहेत व महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आपल्याला हवा तसा तपास करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने द्यावेत,’ अशी मागणीही परमबीर सिंग यांनी याचिकेमध्ये केली आहे. माझ्याविरोधात काही पावले उचलली गेल्यास त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी कोर्टाने निर्देश द्यावेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

दिल्लीत परमबीर कुणाला भेटले, कधी भेटले? काय चर्चा केली? सगळं माहितीय, वेळ येताच सगळं उघड करू

मनसुख हिरेन प्रकरणाचे गुजरात कनेक्शन उघड? व्हॉट्सऍप कॉलमुळे दोन आरोपी ATS च्या जाळ्यात

मनसुख हिरेन यांना शेवटचा फोन केलेला व्यक्ती कोण? एटीएसच्या हाती लागला मोठा पुरावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.