परमबीर सिंग यांनी पुन्हा टाकला एक लेटर बॉम्ब; महाराष्ट्राच्या डीजीपीवर केले गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. परमबीर सिंग यांनी पुन्हा एक लेटर बॉम्ब टाकला असून यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

परमबीर सिंग यांनी सीबीआयला लिहिलेल्या पत्रात, त्यांनी संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच मी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचे म्हटले आहे. जर मी आरोप मागे घेतले, तर माझ्यावर सुरु असलेली कारवाई बंद केली जाईल, असे मला संजय पांडे यांनी म्हटले आहे, असेही परमबीर यांनी पत्रात म्हटले आहे.

अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेल्या चौकशीला बंद करण्यासाठी ते सर्व प्रयत्न करत आहे, असे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. तसेच परमबीर यांनी असेही म्हटले आहे, की साक्षीदारांना भटकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परमबीर सिंग यांनी असा दावा केला आहे, की महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी त्यांना फोन केला होता. त्यावेळी संजय पांडे मला म्हणाले, तुम्ही सिस्टिम विरोधात जरी लढले तरी सिस्टिम तुम्हाला कधी जिंकू देणार नाही. तुमच्या विरोधात १ एप्रिल २०२१ ला सुरु केलेली चौकशीबाबत अजून विचार केला जात आहे.

जरी तुम्ही बरोबर असाल, तरी तुम्ही सरकारशी लढायला नाही पाहिजे. ते तुम्हाला आणखी महागात पडू शकते. शेवटी तुम्ही उधवस्त व्हाल, असेही परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले पत्र परत घेण्याचा सल्ला मला संजय पांडे यांनी दिला असल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.

तसेच पत्र परत घेताना असे म्हटले पाहिजे की, मी माजी गृहमंत्री अनिक देशमुख यांच्या वक्तव्यांमुळे नाराज झालो होतो. त्यामुळे मी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. असा बोलण्याचा सल्ला मला संजय पांडे यांनी दिला आहे, असा आरोपही परमबीर यांनी संजय पांडे यांच्यावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अब्जाधीश पतीने केला ४००० महिलांसोबत झोपण्याचा दावा; ऐकल्यावर बायकोनेच दिले विष
८ महीन्याच्या गर्भवतीसोबत फौजी पती व घरच्यांनी केले असे काही की, वाचून डोळ्यात पाणी येईल
फुकटचे सल्ले देणं थांबव अन् स्वत: लोकांना मदत कर; अभिनेत्रीने कंगणाला सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.