मोठी बातमी! परमबीर सिंह बेपत्ता, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे परमबीर सिंह चांगलेच चर्चेत आले होते. पण सध्या काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

३० एप्रिलपासून परमबीर सिंह रजेवर होते. त्यांनी आपण चंदीगडला जात असल्याचे सांगितले होते. पण ते तिथे न गेल्यामुळे देशसोडून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाकडून म्हणजेच सीआयडीकडून त्यांचा शोध सुरु आहे.

तसेच एक पथक परमबीर सिंघाच्या मुळगावी म्हणजेच चंदीगड येथे ठिय्या मारुन बसलेले आहे. परमबीर सिंह यांना न्या. चांदीवाल आयोगाने अजामीनपात्र वॉरंट बजावले असून हे वॉरंट देण्यासाठी पथ तिकडे गेले होते. तेव्हा ते तिथे नसल्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे.

परमबीर सिंह यांच्यावरही अनेक खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे ३० एप्रिलपासून रजेवर गेले होते. आधी आठ दिवसांची रजा संपल्यानंतर त्यांनी सतत आजारी असल्याचे सांगत मेडिकल लिव्ह वाढवली. १५ दिवसांपासून त्यांनी गृहविभागीशी संपर्क साधला नसल्याचीही माहिती मिळत आहे.

न्या. चांदीवाल आयोगाच्या सुनावणीला ते एकदाही हजर राहिलेले नाही. त्यामुळे आयोगाने त्यांना अजानीमपात्र वॉरंट बजावले. सीआयडीने आधी मरिन लाईन्सच्या निवासस्थानी संपर्क साधला, पण ते घर पाच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पथकाने चंदीगडच्या निवासस्थानी शोध घेतला पण तिथेही ते सापडले नाही.

तसेच गेल्या पाच महिन्यांपासून परमबीर सिंह यांचे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ आहे. त्यामुळे त्यांच्यावर लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. तरी त्या त्याआधीच ते परदेशात निघून गेल्याची माहिती मिळत आहे. ते नेपाळमार्ग लंडनला फरार झाल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

राखीचा काही नेम नाही! आमदाराला म्हणाली, माझे नाव घेतले तर मी तुमचा चड्ढा उतरवेन
टिम इंडीयात उभी फूट! विराटच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे संतप्त खेळाडूंची थेट जय शहांकडे तक्रार
शास्त्रींच्या राजीनाम्यानंतर कोण होणार भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक?; वेगळेच नाव आले आघाडीवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.