..तरच खड्ड्यातून बाहेर येईल, सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर परमबीर सिंगांचे उत्तर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ‘परमबीर सिंग’ यांनी सर्वोच्च न्यायालयात संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे.  न्यायालयाने म्हटले आहे कि, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सध्या संरक्षण मिळणार नाही, जोपर्यंत ते कुठे आहेत हे सांगत नाहीत. तुम्ही देशात आहात कि देशाबाहेर आहात?

न्यायमूर्ती संजय किशन कौल म्हणाले – तुम्ही कोणत्याही तपासात सहभागी झाला नाही आणि संरक्षण आदेश मागत आहात. आमची शंका चुकीची असू शकते पण तुम्ही परदेशात असाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही ते कसे देणार? सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, २२ नोव्हेंबरला परमबीर कुठे आहे ते सांगा.

या संपूर्ण प्रकरणावर परमबीरच्या वतीने सांगण्यात आले की, जर मला श्वास घेऊ देण्याची परवानगी दिली तरचं मी खड्ड्यातून बाहेर येईन. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वी मुंबई न्यायालयाने परमबीर सिंग यांना फरारी गुन्हेगार घोषित करण्यास परवानगी दिली होती.

त्यानंतर आता मुंबई पोलीस त्याला वाँटेड आरोपी म्हणून घोषित करू शकतात आणि प्रसारमाध्यमांसह संभाव्य सर्व ठिकाणी त्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. माहितीनुसार- ३० दिवसांत ते कायद्यासमोर आले नाहीत, तर मुंबई पोलिस त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतील.

२२ जुलै रोजी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, इतर पाच पोलीस कर्मचारी आणि अन्य दोघांविरोधात एका बिल्डरकडून १५ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी परस्पर संगनमताने तक्रारदाराच्या हॉटेल आणि बारवर कारवाईचा धाक दाखवून ११.९२ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतरही त्याला कसलीही पर्वा नाही. परमबीर सिंह यांनी मुंबईचे माजी गृहमंत्री ‘अनिल देशमुख’ यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचे आरोप केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी देशमुख यांच्यावर हस्तक्षेप करून पोलिसांचा वापर करून दरमहा १०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला होता. मुकेश अंबानी बॉम्ब प्रकरणातील संथ तपासासाठी पदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.