बापाने पेपर टाकून इंजिनीअर केलं, नोकरी मिळाली, साखरपुडाही झाला पण कोरोनाने सगळं हिरावलं

पंढरपूर । कोरोनामुळे राज्यातील अनेक घरांमधील जेष्ठ, तरुण या जगाला सोडून जात आहेत. अनेकांची स्वप्ने एका क्षणात संपत आहेत. अनेकांच्या आयुष्यात चांगलेच दिवस सुरू झाले आणि त्याच्या नशिबी भलतंच काहीस आलं आहे. अशीच परिस्थिती पंढरपूरमधील एका कुटूंबावर आली आहे.

बापाने पेपर विकून आपल्या मुलाला इंजिनीअर केले. मुलाने शिक्षणात आपली चमक दाखवली आणि त्याला बड्या कंपनीत नोकरीही मिळाली. कुटुंब आनंदात होतं आणि यातच मुलाला कोरोनाची लागण झाली. उपचार केले, मात्र कोरोनारुपी काळाने त्याला हिरावून नेले.

पंढरपुरातील शुभम भोसले असे या तरुणाचे नाव आहे. शुभम हा अतिशय गरिबीत शिकला, वडिलांना घरोघरी पेपर टाकण्यात मदत करायचा. वडील सोमनाथ भोसले हे पंढरपुरातील पेपर विक्रेते होते, त्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून शुभमचा दिवस सुरु व्हायचा.

आशा परिस्थितीत त्याने शिक्षण पूर्ण केले. बारावीला देखील चांगले मार्क मिळवून पंढरपूरमध्ये इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या पदवी चांगल्या गुणांनी मिळवली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांला चांगले मार्क्स असल्याने लगेच कोलकाता इथे टीसीएस या बड्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. यामुळे घरच्यांना मोठा आनंद झाला. आता चांगले दिवस येणार होते, मात्र असे असताना एक वाईट घटना घडली.

चार-पाच दिवसांपूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. पंढरपूर येथे उपचार करून त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र कोरोनाचा प्रसार वाढल्याने तो सगळ्यांना सोडून निघून गेला.

या घटनेने अवघ्या २४ वर्षाचा शुभम अर्ध्यावरच वाट सोडून निघून गेला. शुभमच्या मृत्यूने भोसले कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे लग्न जमले होते, आणि साखरपुडा देखील झाला होता.

ताज्या बातम्या

किस्से आबांचे: जेव्हा आबा ड्रायव्हरला म्हणतात गाडी तुझ्या घरी घे; आई बाबांना भेटू..

जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?

लग्नात घुसून वऱ्हाडींवर कठोर कारवाई करणाऱ्या ‘त्या’ कलेक्टरचे भाजप सरकारकडून निलंबन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.