पंतप्रधान नेत्यानाहूंनी इस्रायलला पाठींबा देणाऱ्या सर्व देशांचे मानले आभार; मात्र भारताचे नावही नाही घेतले

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सध्याच्या घडीला युद्ध चालू आहे. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात इस्त्रायलच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल विविध देशांचे आभार मानले आहेत.

बेंजामिन यांनी यावेळी पाठींबा देणाऱ्या देशांचे ध्व्ज ट्विट करत आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट केलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश नसल्याबद्द्दल अनेक युझर्सने नेतान्याहू यांच्यावर टीका केली आहे. शनिवारी इस्त्रायलने पट्टीवर होत असलेल्या हवाई हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला होता.

इस्त्रायलने केलेल्या हल्यात हमासच्या नेत्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. इस्त्रायलने केलेल्या गाझा पट्टीवरील हल्यात असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेचे कार्यालय पण उध्वस्त झाले आहे. या इमारतीमध्ये असोसिएटेड प्रेस आणि लाझीरा सोबत इतर कार्यालय पण होती.

नेतान्याहू यांनी इस्त्रायलला पाठींबा देणाऱ्या देशांचे ध्व्ज ट्विट करून त्यांचे आभार मानले आहेत. नेतान्याहू यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, “दहशतवादी हल्ल्यांविरोधात इस्रायलच्या बाजूने उभे राहून आणि स्वसंरक्षणाच्या अधिकारास पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.”

दरम्यान या लढाईत अनेक भारतीयांनी इस्त्रायल देशाला पाठींबा दिला आहे. जेव्हापासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध चालू झाले तेव्हापासून भारतीय इस्त्रायलच्या बाजूने असल्याचे दिसून आले आहे.

#IndiaStandsWithIsrael ही युद्धजन्य परिस्थिती जेव्हा चालू झाली तेव्हापासून हा ट्रेंड भारतीयांनी उचलून धरला होता. भारतीयांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यानंतरही भारताचे आभार का मानले गेले नाही असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. यातील काही जणांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी असेही काही युझर्सने म्हटले आहे.

ताज्या बातम्या
मराठमोळ्या श्रेयसला बाॅलीवूडमध्ये सिनेमे का मिळत नाहीत? स्वत: श्रेयसनेच सांगीतले ‘ते’ घाणेरडे कारण

रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त

VIDEO: मासे पकडायला गेलेल्या तरुणाच्या मागे लागली मगर, मग पहा पुढे काय झालं…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.