Share

‘मी तुमचा सदैव आभारी आणि ऋणी राहीन’; पंतने उघड केली त्या दोन देवदूतांची नावे ज्यांनी वाचवले होते प्राण

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतवर मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 30 डिसेंबरच्या पहाटे कार अपघातात पंत जखमी झाला. या अपघातात पंतला खूप दुखापत झाली होती. अलीकडेच त्याच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.

पंत आता हळूहळू बरा होत आहे. अपघातानंतर प्रथमच डावखुरा फलंदाज पंतची प्रतिक्रिया आली आहे. कठीण प्रसंगी मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. विशेषत: या यष्टीरक्षकाने त्या दोन ‘देवदूतांचा’ उल्लेख केला आहे ज्यांनी अपघाताच्या वेळी योग्य वेळात रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली.

दोन मुलांचा त्याच्या आईसोबतचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत २५ वर्षीय ऋषभ पंतने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘मी वैयक्तिकरित्या सर्वांचे आभार मानू शकत नाही, पण मला या दोन वीरांचे आभार मानायलाच हवेत. माझ्या अपघातादरम्यान ज्यांनी मला मदत केली आणि मी सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचलो याची खातरजमा करतो. रजत कुमार आणि निशू कुमार, धन्यवाद. मी तुम्हा दोघांचा सदैव आभारी आणि ऋणी राहीन.

पंतने सोशल मीडियावर आपल्या तब्येतीची माहितीही दिली आहे. त्यानी लिहिले की, ‘मी सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे हे सर्वांना सांगू इच्छितो. मी बरे होण्याच्या मार्गावर आहे याबद्दल मी आभारी आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि सरकारी अधिकाऱ्यांशिवाय पंतने डॉक्टर आणि फिजिओ टीमचेही आभार मानले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत 2023 पर्यंत क्रिकेटपासून दूर राहू शकतो. यंदाच्या विश्वचषकात त्याची खेळण्याची शक्यताही कमी आहे. अहवालानुसार, पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे 8 महिने लागू शकतात. पुढील 6 आठवड्यांत त्याच्या दुसऱ्या लिगामेंटवरही शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या
२०० तोळे सोन्याची चोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी लढवली भन्नाट शक्कल, शेतकरी बनले अन्… 
रामदास कदमांचा खेळ खल्लास! उद्धव ठाकरेंनी असा डाव खेळलाय की कदमांचे अवसानच गळाले
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ आहेत कोट्यवधी रुपयांचे मालक, संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का 

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now