….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’

मुंबई | राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ देखील पूर्ण केला आहे. या एक वर्षाच्या कार्यकाळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.

अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना लक्ष केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक विरोधकांनी कौतुक केले. तसेच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही शरद पवारांचे तोंड भरून कौतुक केलं आहे.

ऊसतोडणी मजुरांच्या वेतनवाढप्रश्नी झालेल्या बैठकीत शरद पवार हे सलग आठ तास बसून होते. आम्ही त्यांच्या निम्म्या वयाचे असतानाही उठत होतो.  कोणी पाणी प्यायला किंवा अन्य कारणांसाठी जागेवरून उठले असताना पवार साहेबांची ही कार्यशैली आवडल्याचे मत व्यक्त करणे म्हणजे महाराष्ट्राच्या खेळीमेळीच्या राजकारणाचे ते प्रतिक आहे,  अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केल्यामागची कारणे सांगितली.

दरम्यान, शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार तुमच्या बोलण्यात येतात, याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणतात, ‘साखर कारखानादारीचा आणि त्यांचा प्रश्नांचा सर्वाधिक अभ्यास आणि अनुभव हा शरद पवारांचा आहे. त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय या क्षेत्रात कोणी निर्णय़ घेऊ शकत नाही.’

महत्त्वाच्या बातम्या
शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; म्हणाला…
कोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; घ्या जाणून
लस घ्यायची असल्यास सरकारच्या ‘या’ आदेशांचे करावे लागणार पालन; घ्या जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.