मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला; सातवांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंची रडवणारी पोस्ट

पुणे | कॉंग्रेसचे मोठे नेते खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. पण अखेर राजीव सातव ही लढाई हारले आहेत. पुण्यातील जहांगीर हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँंग्रेसमधील नेत्यांनी राजीव सातव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच विविध पक्षातील नेत्यांनीही सातव यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे.

माजी महिला व बालकल्याण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला आहे. मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, सामान्य समाजासाठी धडपडणारा एक तरूण उमदा नेता राजीव सातव यांच्या रुपाने आज आपण गमावला आहे.

या क्रूर कोरोनाने राजीव सातव यांचा घास घेतला आहे. मी मनापासून दु:ख व्यक्त करते. सातव परिवाराच्या दु:खामध्ये मुंडे परिवार सहभागी आहे. आज काँग्रेसने एक चांगला उमदा नेता गमावलाच आहे.

पण आज मुंडे साहेबांचा लाडका राजीव हा सुध्दा गमावला आहे. राजीवजीचे आणि मुंडे साहेबांचे जिव्हाळ्याचे संंबंध होते. आज त्यांच्या जाण्याने खुप मोठे नुकसान झाले आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी श्रध्दांजली व्यक्त केली आहे.

 

राजीव सातव हे महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे बडे नेते होते. दिल्लीत कॉंग्रेस पक्षात त्यांचे चांगलेच वजन होते. राहूल गांधी यांच्या ते खूप जवळचे होते. २०१४ च्या मोदी लाटेत राजीव सातव शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत खासदार झाले होते.

राजीव  सातव यांच्यावर उद्या सकाळी  मुळगावी हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती काँग्रेस नेते मंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सर्वात जवळचा सहकारी राजीव सातवांच्या निधनानंतर राहूल गांधी झाले हळवे; दिली ह्रदयद्रावक प्रतिक्रीया
राहूल गांधींचा राईट हॅंड असलेला महाराष्ट्रातील काॅंग्रेसचा झुंझार नेता काळाच्या पडद्याआड
तुझ्यासारखे लोक देशात आहेत याची लाज वाटते; टीम इंडियाचा क्रिकेटपटू चाहत्यावर भडकला
..त्यावेळी सचिन जेव्हापण मान डोलवायचा भजी त्याच्यासमोर येऊन उभा राहायचा, वाचा भन्नाट किस्सा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.