…हे मी बोललेच नाही, एबीपी माझाने तात्काळ माफी मागावी – पंकजा मुंडे

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंढे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर चुकीचे वृत्त दिले असल्याचा आरोप केला आहे. ‘मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार परवडत नाही,’ अशी टिका पंकजा मुंढे यांनी हिंगोलीत केले असल्याचे वृत्त एबीपी माझा प्रसारित केले होते.

यावर आक्षेप घेत पंकजा मुंढे ट्विट करत म्हणतात, ‘अशा प्रकारचे स्टेटमेंट मी दिलेले नाही मी कधीही असे बोलत नाही. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तात्काळ माफी मागावी आणि ही बातमी वापस घ्यावी. हे अत्यंत अयोग्य आहे व हे वारंवार होण्याबद्दल मला खंत वाटते, असे त्यांनी म्हटंले आहे.

‘एबीपी माझा’कडून स्पष्टीकरण…
संबंधित बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रकाशित झाली होती. चॅनेलवरुन ही बातमी प्रसारित झालेली नाही. एबीपी माझाच्या सर्व डिजिटल हँडलवरुन ही बातमी काढून टाकण्यात आलीय. चुकीची बातमी देणाऱ्या संबंधित प्रतिनिधीवर कठोर कारवाई करण्यात आलीय. आपल्याला झालेल्या मनस्तापाबद्धल दिलगीर आहोत.’

काय आहे पंकजा मुंढे यांचा आरोप…
‘मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार परवडत नाही,’ अशी टिका पंकजा मुंढे यांनी हिंगोलीत केले असल्याचे वृत्त एबीपी माझा प्रसारित केले होते.  यावरून  एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तात्काळ माफी मागावी आणि ही बातमी वापस घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या
कंगना राणावतने केलेल्या टिकेवर पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री, म्हणाले…
जवान शहीद झाल्याच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नाही; अख्या गावावर दु:खाचा डोंगर
रुपाली पाटलांच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद; भाजप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.