पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार? 25 मतदारसंघांवर आहे थेट प्रभाव

मुंबई । 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे दिसून आले आहे. याबाबत त्यांनी अनेकदा उघडपणे वक्तव्य केली आहेत. पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे बीड जिल्ह्यात भाजपची ताकद देखील कमी झाली आहे.

आता त्या नाराज असल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड या गावात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मी फाटक्या माणसाच्या पायावर डोके ठेवेन पण पदासाठी कुणापुढेही हात पसरणार नाही, असे वक्तव्य केले आहे, यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.

यामुळे या नाराजीचा भाजपला फटका बसेल का असे देखील विचारले जात आहे. आगामी काळात याचे उत्तर आपल्याला मिळणार आहे. बंजारा समाजातील माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या गौरव कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे बोलत असताना मी फाटक्या माणसांच्या पायावरती डोकं ठेवेन मात्र पदासाठी कुणापुढेही हात पसरणार नाही, असे म्हटले. यामुळे त्यांची नाराजी समोर आली.

बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात पंकजा मुंडे या भाजपच्या मोठ्या नेत्या मानल्या जातात. महाराष्ट्रातल्या किमान 25 मतदारसंघांवर पंकजा यांचा थेट प्रभाव आहे. अनेक कार्यकर्ते त्यांचे राज्यभरात आहेत. यामुळे त्यांनी ठरवले तर पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.

असे असताना मात्र त्यांना सध्या पक्षांमध्ये न्याय मिळत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. यामुळे भाजपला याचा फकटा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात हे दिसून येईलच. अनेकांना संधी दिली मात्र पंकजा मुंडे यांना मात्र अजून कुठे संधी दिली नाही.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात भागवत कराड यांचा समावेश झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यांनी राजीनामे देखील दिले होते. तेव्हा मात्र दिल्लीत त्यांची नाराजी दूर करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यातील खदखद कायम असल्याचे दिसून आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.