“पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”

मुंबई | पुण्यातील वानवडी येथे पुजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्मह.त्या केली. २३ वर्षीय असलेल्या या तरुणीने रविवारी (ता.७) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्मह.त्या केली आहे. ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील परळीची आहे. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

‘पुजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणावे, असे म्हंटले आहे.

दरम्यान, पुजा चव्हाण हिचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तिने आत्मह.त्या केल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे भाजप ठाकरे सरकारवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता याप्रकरणी संबंधित मंत्र्याच्या नावाची कुजबुज सुरू झाली आहे.

आतापर्यत कोणत्याही नावाचा उल्लेख झाला नाही. मात्र भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी थेट ‘राठोडगिरी’ म्हणत सरकारवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात आत्मह.त्या केलेल्या तरुणीचे राज्यातील ‘या’ मंत्र्यासोबत कनेक्शन
शिवसेनेच्या अडचणी वाढल्या! उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार ईडीच्या रडारवर
चहलच्या बायकोसोबत श्रेयस अय्यरने केलेला ‘हा’ डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील; पहा व्हिडीओ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.