Share

Pankaja Munde PA Wife Suicide in Mumbai: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांसमोर हजर, आज न्यायालयीन सुनावणी

Pankaja Munde PA Wife Suicide in Mumbai: मुंबईत(Mumbai City) सुरू असलेल्या गौरी पालवे-गर्जे आत्महत्येच्या तपासात मोठी घडामोड घडली आहे. पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे(Anant Garje) यांना वरळी पोलिसांनी(Worli Police) रात्री साधारण एकच्या सुमारास अटक केली. गेल्या अनेक तासांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर येत होती. मात्र अखेर त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडी मिळवण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नरत आहे.

या प्रकरणाबद्दल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की, अनंत गर्जे यांची अटक ही गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणात नोंद झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. न्यायालयात पोलिस नेमकी काय मांडणी करतात आणि बचाव पक्षाकडून कोणते मुद्दे मांडले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गर्जे यांच्या वकिलांकडून जामिनासाठी युक्तिवाद केला जाणार आहे.

वरळी पोलिसांची एफआयआर नोंद

या घटनानंतर वरळी पोलिसांनी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तिघांवरही मानसिक छळ, अपमान आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप आहेत. यानंतर प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.

अनंत गर्जे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूने ते पूर्णपणे हेलावले आहेत. सत्य बाहेर यावे आणि तपास प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी, म्हणूनच त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. तपासात जे काही आवश्यक असेल ते सहकार्य करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली आहे.

अंजली दमानिया यांचा पोलिसांवर सवाल

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गौरी पालवे यांचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला तेव्हाच पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा मुद्दा त्यांनी उचलला. त्या म्हणाल्या की, जर मृत्यू संशयास्पद वाटत होता, तर अनंत गर्जे यांना तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी का झाली नाही, याचे उत्तर मुंबई पोलिसांनी द्यावे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now