फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल पण पदासाठी हात फैलावणार नाही; पंकजा मुंडेंचा निशाणा कोणावर?

भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. कारण भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेवर वर्णी लावली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे पुन्हा तिकीट कापल्या गेले आहे.

आता पंकजा मुंडे यांनी पुन्हा आपली खदखद व्यक्त करुन दाखवली आहे. बुलढाणा दुसरबडी येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली खदखद व्यक्ती केली आहे.

माझे माता-पिता सर्वस्व तुम्ही आहात. तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्याही परिक्रमेची आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल, पण कुणासमोर हात फैलावून कुठल्या पदाची मागणी करण्याची आमच्या रक्तात सवय नाहीये, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

एखादी संधी नाही मिळाली तर नाही. पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही. ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नि देताना घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, अशी खदखद पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमादम्यान बोलून दाखवली आहे.

दरम्यान, भाजपने दोन दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, अमल महाडीक, अमरिश पटेल, चंद्रशेखर बावनकुळे वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचे नाव असण्याची चर्चा होती, परंतू तसे झाले नाही.

पंकजा मुंडे यांना यावेळीही विधान परिषदेतून डावलण्यात आले आहे. तर विधानसभेचे तिकीट कापण्यात आलेल्या बावनकुळेंना हे तिकीट देण्यात आलेले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद व्यक्त करुन दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकार BSNL आणि MTNL ची करोडोंची संपत्ती विकणार; जाणून घ्या नेमकी किंमत..
…ही गोष्ट केली तर राज्य सरकारही तुमच्या समोर झुकेल; मराठी अभिनेत्याचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
मुलाला किंवा मुलीला सीमेवर पाठवा, मग इम्रानला ‘मोठा भाऊ’ म्हणा, सिद्धूवर भडकले गौतम गंभीर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.