दिल्लीत भाजपच्या गोटात प्रचंड हालचाल पहायला मिळाली आहे. दिल्लीत आज महत्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून शिंदे सरकारमधील बरेच नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
या बैठकीनंतर आमदारांची नाराजी दुर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावर अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचाही समावेश होता. त्यामुळे असाही अंदाज वर्तवला जात आहे की, पंकजा मुंडे यांची नाराजी दूर होऊ शकते. त्यांना लवकरच मंत्रीपद दिले जाऊ शकते. मंत्रिमंडळाचा मुद्दा जरी महत्वाचा असला तरी भाजपकडून सहकार क्षेत्राशी संबंधित चर्चा करण्यासाठी अमित शहांनी सर्व नेत्यांना बोलावलं होतं अशी माहितीही समोर आली आहे.
विशेष म्हणजे पंकजा मुंडेही यांनाही बैठकीचं निमंत्रण आलं होतं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमित शहांच्या कार्यालयात त्या हजर झाल्या होत्या. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले.
त्याआधी अमित शहा केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, धनंजय महाडिक हे दिग्गज नेते उपस्थित होते. साखर क्षेत्राशी संबंधित ही बैठक होती अशी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अनेक ठिकाणच्या सहकार क्षत्राची सुत्रे आहेत.
यावर काही रणनीती आखली जाते का? यावर चर्चा झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. सहकार क्षेत्राची बैठक संपल्यानंतर अमित शहांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असावी अशीही माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
मालिका जिंकल्यावर रोहितने ‘या’ वृद्ध व्यक्तीकडे दिली ट्रॉफी; पहा भारताच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ
स्वतःच चूक करून ईशानने विराटवर काढला राग, बाद होताच भर मैदानात कोहलीला केली शिवीगाळ; पहा व्हिडिओ
अथिया शेट्टी केएल राहूल झाले विवाहबद्ध; पहा दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो
धीरेंद्रशास्त्रींकडे अदृश्य शक्ती आहे की काही युक्ती? माइंड रीडर सुहानी शहांनी live टेस्टद्वारे केला ‘हा’ दावा